गरमागरम खुसखुशीत पनीर समोसा एकदा खाऊन तर पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 13:15 IST2018-10-20T13:15:35+5:302018-10-20T13:15:47+5:30
भारतातील सर्वाना आवडणाऱ्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक म्हणजे समोसा. संध्याकाळच्या चहासोबत जर समोस असेल तर बात काही औरच.

गरमागरम खुसखुशीत पनीर समोसा एकदा खाऊन तर पाहा!
भारतातील सर्वाना आवडणाऱ्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक म्हणजे समोसा. संध्याकाळच्या चहासोबत जर समोस असेल तर बात काही औरच. समोश्याचं वरील आवरण कुरकुरीत आतमध्ये बटाटा आणि वाटाण्यांचं मिश्रण भरण्यात येतं. त्यानंतर डीप फ्राय करून समोसा तयार करण्यात येतो. आता अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आणि प्रकारचे समोसे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही घरच्या घरीही अगदी सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे समोसे तयार करू शकता. जाणून घेऊया घरच्या घरी पनीर समोसा तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- 250 ग्रॅम बारीक किसलेलं पनीर
- 2 कप मैदा
- 1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला)
- 2 बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- 1 टिस्पून लाल मिरची पावडर
- 1/2 टिस्पून जीरं
- 1 टिस्पूव लिंबाचा रस
- 50 ग्रॅम बटर
- मीठ चवीनुसार
- तळण्यासाठी तेल
कृती :
- मैदा, बटर आणि मीठ एका भांड्यामध्ये एकत्र करून मळून घ्या.
- त्यानंतर एका ओल्या कपड्याने झाकून ठेवा
- एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये जीरं टाका.
- जीरं तडतडल्यावर हिरवी मिरची, कांदा परतून घ्या.
- कांदा परतल्यावर त्यामध्ये लाल मिरची पावडर, लिंबाचा रस, मीठ आणि पनीर टाकून नीट एकत्र करा.
- आता तयार पिठाच्या पुऱ्या लाटून त्या मधोमध कापा.
- कापलेला अर्धा भाग हातामध्ये घेऊन त्याचा एका कोनाप्रमाणे आकार करून घ्या. त्यामध्ये तयार केलेलं स्टफिंग टाकून खआलच्या बाजूने तो कोन बंद करा.
- एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तयार केलेले समोसे तळून घ्या.
- गरमागरम पनीर समोसे खाण्यासाठी तयार आहेत.
- तुम्ही चटनी किंवा सॉस बरोबर समोसे सर्व्ह करू शकता.