Paneer Chilly Recipe : आता हॉटेलची गरज नाही, घरीच बनवा टेस्टी पनीर चिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 16:46 IST2019-12-19T16:44:49+5:302019-12-19T16:46:27+5:30
Tasty Paneer Chilly Recipe : चायनीज पदार्थ हल्ली खूप आवडीने खाल्ले जातात. विशेषतः चायनीज फ्राईड राईस किंवा नूडल्स अनेकांना आवडतात. त्याचसोबत चायनीज स्टार्टर्स आणि सूपही घेण्यामागेही अनेकांचा कल असतो.

Paneer Chilly Recipe : आता हॉटेलची गरज नाही, घरीच बनवा टेस्टी पनीर चिली
पुणे : चायनीज पदार्थ हल्ली खूप आवडीने खाल्ले जातात. विशेषतः चायनीज फ्राईड राईस किंवा नूडल्स अनेकांना आवडतात. त्याचसोबत चायनीज स्टार्टर्स आणि सूपही घेण्यामागेही अनेकांचा कल असतो. मात्र चायनीज पदार्थ बनवणे तितकेसे अवघड नाही. उलट घरच्या घरी आणि स्वच्छ वातावरणात केलेले चायनीज आरोग्यासाठी कमी हानिकारक आहे. चला तर बघूया चवदार पनीर चिली'ची रेसिपी.
साहीत्य -
२०० ग्रॅम ताजे पनीर
१ कप उभा चिरलेला कांदा
१ कप भोपळी मिरची उभी चिरून
६-७ लसूण पाकळ्या चिरून
२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
१ टीस्पून विनेगर
१/४ टीस्पून मिरपूड
१/४ कप डार्क सोया सोस
३ टेबलस्पून कॉर्नफ्लोर
मीठ चवीप्रमाणे
तेल
कृती :
- पनीरचे चौकोनी तुकडे करा.२ टेबलस्पून कॉर्नफ्लोअरमध्ये २ चिमुट मीठ घाला त्यात १/४ कप पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा. पनीरचे तुकडे त्यात घोळवून तेलात गोल्डन ब्राऊन रंगावर शालो फ्राय करून घ्या.
- कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात लसूण फोडणीला घाला. लसूण परता आणि लगेच हिरवी मिरची कांदा आणि भोपळी मिरची घालून परता.
- २ टेबलस्पून सोया सॉस, शेजवान सॉस, मीठ,मिरपूड, विनेगर घाला.
- भाज्या ३-४ मिनिटे परतून घ्या. भोपळी मिरची अर्धवट शिजेपर्यंत परता. आता त्याचे पनीरचे तुकडे घालून परता.
- उरलेल्या कॉर्नफ्लोरमध्ये १/२ कप पाणी, ४-५ टेबलस्पून सोया सॉस,२ चिमुट मीठ, घालून मिश्रण एकजीव करा. आणि उकळायला ठेवा. उकळी आली कि सॉस जाडसर होऊ लागेल. एकीकडे सतत ढवळत रहा.
- सॉस घट्ट झाला की पनीर आणि भाज्यांवर ओता.वरून कांद्याची पात घाला आणि एकदा परतून लगेच सर्व्ह करा पनीर चिली