शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

उकडीचे माझा मोदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 10:43 AM

आम्ही तुमच्याशी 'माझा मोदक' या उपक्रमाअंतर्गत एक नवीन मोदकांची रेसिपी शेअर करणार आहोत.

गणेशोत्सव सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महिलांची लगबग सुरू झाली आहे. यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जास्त झगमगाट नसला तरी घराच्या घरी मात्र उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यात आधी डोक्यात येतं, ते म्हणजे बाप्पाच्या आणि तुम्हा-आम्हा सगळ्यांच्या आवडीचे मोदक. घरोघरच्या गृहिणी नावीन्यपूर्ण मोदक आणि मेजवानी कशी करता येईल या विचारात असतात. म्हणूनच आम्ही तुमच्याशी 'माझा मोदक' या उपक्रमाअंतर्गत एक नवीन मोदकांची रेसिपी शेअर करणार आहोत.

रत्नागिरीतल्या हापूस आंब्यापासून बनवलेलं माझा हे पेय वापरून तुम्ही उत्कृष्ट चवीचे मोदक घरच्या घरी तयार करू शकता. आंब्यापासून तयार केलेलं माझा हे पेय बऱ्याच जणांना आवडतं. सगळ्याच ऋतूमध्ये अस्सल. उन्हाळ्यात आंब्याचा मोसम येतो तेव्हाच वेगवेगळ्या आंब्याच्या रेसिपीज बनवल्या जातात. पण आता येत्या गणेशोत्सवात रत्नागिरीतल्या हापूस आंब्यापासून तयार केलेल्या माझा या पेयाचा वापर करून तुम्ही अप्रतिम चवीचे मोदक बनवू शकता. साधे उकडीचे मोदक बनवण्यापेक्षा तुम्ही यात माझा वापराल तर छान आंब्याचा फ्लेवर मोदकांना येऊन रिच टेस्ट येईल. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे 'उकडीचे माझा मोदक'.*

'उकडीच्या माझा मोदकां'साठी लागणारं साहित्य:

३५० मिली माझा पेय

तांदळाची पिठी- ४ वाट्या

पाणी- ३ वाट्या

तेल- १ पळी

साजूक तूप- १ लहान चमचा

मीठ- चवीपुरते

ओलं खोबरं- १ वाटी

चिरलेला गूळ- पाऊण वाटी

उकडीचे 'माझा मोदक' तयार करण्याची कृती :

- एका भांड्यामध्ये तूप घ्या.

- त्यामध्ये खवलेलं खोबरं आणि गूळ एकत्र करून शिजवून घ्या. शिजवताना त्यात माझा पेयाचं अर्धा पेला मिश्रण करा. आवश्यकतेनुसार अजून घालू शकता. माझा घातल्यानं अस्सल चवीचा आणि नैसर्गिक आंब्याचा फ्लेवर सारणाला येईल .

- प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा.

- थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका.

- पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदळाची पिठी घाला.

- सर्व मिश्रण नीट एकत्र करून एक वाफ काढा, मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ द्या.

- थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्या. मळताना माझा शीतपेय घाला. लक्षात ठेवा पिठात माझा घालताना ते रूम टेम्परेचरवर असावे. कणकेत मँगो माझा घातल्यानं  सॉफ्ट आणि आंब्याचा नॅचरल टेक्सचर  या कणकेला येईल. माझा हे रत्नागिरीच्या  हापूस आंब्याचं पेय असल्यामुळे कणकेत मिसळल्यानंतर सहज एकजीव होतं.

- उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून घ्या.

- उकडीला खोलगट वाटीचा आकार द्या.

- त्यामध्ये खोबरं गूळ आणि माझाचं शिजवलेलं सारण भरा.

- त्यानंतर वाटीला एक एक करून पाकळ्या काढा. पाकळ्या जितक्या जवळ आणि सारख्या अंतरावर असतील तेवढा मोदक आकर्षक दिसेल.

- त्यानंतर तळव्यावर ठेवून बोटांच्या साहाय्याने पाकळ्या बंद करून वरच्या बाजूला टोक ठेवा.

- रेखीव आणि मुलायम उकडीचे चविष्ट आणि जाडसर 'माझा मोदक' बाप्पासाठी तयार आहेत. उकडीचे माझा मोदक तुपासोबत खाताना अप्रतिम हापूस आंब्याची रिच टेस्ट त्यात उतरेल. बाप्पालासह खाणारेही म्हणतील लाजवाब माझा मोदक.

('माझा मोदक'' स्पर्धेत सहभागी व्हा... आपल्या मोदकांच्या रेसिपीचा व्हिडीओ.  www.lokmat.com/maazmodak/ या वेबसाईटवर पाठवा... पहिले पाच विजेते ठरतील आयफोन 7 चे मानकरी, तर त्यापुढच्या पाच विजेत्यांना मिळणार आहे, अ‍ॅमेझॉन इको प्लस सेकंड जनरेशन!)

टॅग्स :Maaza Modak Recipesमाझा मोदक रेसिपीजGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपीReceipeपाककृती