शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आवळ्याचे माहीत असतील आता मोरावळ्याचे हे फायदे जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 13:53 IST

आवळ्याच्या मुरब्ब्याने हाडे मजबूत होणे, रक्त शुद्ध होणे आणि स्मरणशक्ती वाढणे असे फायदे होतात. यासोबतच आणखीही काही फायदे आवळ्याच्या मुरब्ब्याचे होतात, ते जाणून घेऊन...

आयुर्वेदात आवळ्याला फार आरोग्यदायी आणि पौष्टिक मानलं गेलं आहे. कारण आवळा एक औषधी फळ आहे. याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होता, पण केवळ आवळ्याच्या फळापेक्षाही जास्त फायदे आवळ्याच्या मुरब्ब्याचे म्हणजेच मोरावळ्याचे होतात. मोरावळ्याने हाडे मजबूत होणे, रक्त शुद्ध होणे आणि स्मरणशक्ती वाढणे असे फायदे होतात. यासोबतच आणखीही काही फायदे मोरावळ्याचे होतात, ते जाणून घेऊन...

गर्भावस्था

असे सांगितले जाते की, गर्भवती महिलांनी मोरावळ्याचं सेवन भरपूर प्रमाणात करावं. हे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. गर्भवती महिलांनी मोरावळ्याचे नियमीत खाल्ला तर शरीरात हार्मोनल बदलामुळे होणारी केसगळतीची समस्या रोखली जाऊ शकते. तसेच मोरावळ्याने बाळाच्या डोळ्यांची क्षमताही वाढवण्यास मदत करतं. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. तसेच यात असणाऱ्या अॅंटी-ऑक्सिडेंट गुणामुळे रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. याने थंडी वाजणे, ताप येणे आणि सतत होणाऱ्या संक्रमणापासून बचाव केला जातो.  

मासिक पाळीतील समस्या दूर होतील

महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आवळ्याचा मुरब्बा फार फायदेशीर ठरतो. ज्यांना फार जास्त वेदना होतात त्यांनी याचं सेवन नियमीत करावं. तसेच मासिक पाळीसंबंधी इतरही समस्यांपासून याने सुटका मिळते. 

पिंपल्स आणि डाग दूर होतील

त्वचा चांगली आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रासायनिक उत्पादनांचा वापर करत असाल. अनेकदा याने काही साइट इफेक्टही होत असतील. अशात नैसर्गिक उपाय म्हणून तुम्ही मोरावळा खाल तर फायदा होऊ शकतो. तुमच्या त्वचेवर येणारे पिंपल्स आणि डाग दूर करण्यास याने मदत मिळते. त्वचेसंबंधी ही समस्या दूर करण्यासाठी हा सर्वात चांगला नैसर्गिक उपाय ठरु शकतो. 

रक्ताची कमतरता दूर होते

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आढळतं. यात हीमोग्लोबिन स्तर वाढवण्याची क्षमता असते. ज्या लोकांमध्ये रक्ताची कमतरता असते, त्यांच्यासाठी मोरावळा एका औषधीसारखा काम करतो. मासिक पाळी दरम्यान फार जास्त स्त्राव होत असेल तर मोरावळ्या नक्की खावा.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी

क्रोमियम, झिंक आणि कॉपर हे शरीरासाठी आवश्यक तत्व आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. क्रोमियम खासकरुन रक्तातील कोलेस्ट्रॉल स्तर आणि हृदय रोगांचा धोका कमी करण्यास मदत करतं. तसेच मोरावळ्याने रक्त वाहिन्यांमधील सूज कमी करण्यासही याने मदत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार