इम्युनिटी बुस्टर आहे लापशीचा हलवा...एकदा ट्राय करून बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 14:40 IST2021-05-13T14:25:08+5:302021-05-13T14:40:01+5:30
लापशीच्या हलव्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोनाकाळात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर लापशीचा हलवा तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे.

इम्युनिटी बुस्टर आहे लापशीचा हलवा...एकदा ट्राय करून बघाच
लापशी हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही घरात अगदी सहज मिळून जातो. त्याची खीर सर्वांनाच आवडते पण त्याचा हलवा खूपच चविष्ट लागतो. हा हलवा खायला चविष्ट तर आहेच पण त्याचे फायदे भरपूर आहेत. या हलव्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोनाकाळात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर लापशीचा हलवा तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे.
न्युट्रीशनिस्टचं मत काय?
प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्या म्हणण्यानुसार लापशीचा हलवा दूध, साखर, सुकामेवा आणि केशरने बनवला जातो. त्यामुळे भूक वाढते आणि लवकर पोटही भरते. आपल्या घरात कुणी आजारी पडलं तर त्याला लापशीचा हलवा द्यावा.
त्या पुढे असंही म्हणाल्या की घरातील पुजेच्या वेळी प्रसाद म्हणून हा हलवा दिला जातो. त्याचप्रमाणे ही पूजा जेव्हा जेव्हा नवीन मोसम सुरु होतो तेव्हा केली जाते. त्याचवेळी हा हलवा बनवण्याचं कारण म्हणजे बदलत्या मोसमानुसार योग्य आहार शरीराला मिळावा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी.
कसा बनवाल लापशीचा हलवा?
साहित्य
१ वाटी लापशी, १ वाटी साखर, ४ वाटी पाणी, अर्धा कप तूप, थोडीशी वेलची पावडर, बदाम आणि काजूचे तुकडे.
कृती
कढईमध्ये तुप घालुन लापशी खरपूस भाजून घ्या. त्याचा रंग थोडा लालसर झाला की त्यात पाणी टाका, पाणी आटेपर्यंत हलवा ढवळत राहा. त्यात साखर टाकून विरघळेपर्यंत शिजवत रहा. साखर विरघळली त्यात थोडी वेलची पावडर टाका. गॅस बंद करून त्यात बदाम व काजू घाला. झाला सुजी हलवा तयार.