नारळाचं दूध, पपईचा मसाज अन मेथ्यांची पेस्ट असेल तर केस खराब करण्याची उन्हाची हिंमत होईलच कशी?
By Admin | Updated: May 3, 2017 18:54 IST2017-05-03T18:54:55+5:302017-05-03T18:54:55+5:30
उन्हाळ्यात केसांना जीवनसत्त्वं आणि खनिजं हवी असतात. केसांच्या मुळांना हलक्या हातानं मसाज हवा असतो.त्यासाठी फळं-फूलं-पानांचा अर्क, दही दूध गरजेचं असतं.

नारळाचं दूध, पपईचा मसाज अन मेथ्यांची पेस्ट असेल तर केस खराब करण्याची उन्हाची हिंमत होईलच कशी?
उन्हाळ्याच्या ॠतूत कितीही चांगली तयारी केली तरी उन्हाच्या झळा आणि सतत येणारा घाम यामुळे सगळी तयारी वाया जाते. उन्हामुळे त्वचा खराब होवू नये म्हणून त्वचेला अनेक प्रकारचे क्रीम्स आणि लोशन्स लावून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न होतो. पण उन्हामुळे फक्त त्वचाच नाही तर केसांचंही नुकसान होतं. याकाळात जर केसांकडे नीट लक्ष दिलं नाही , उन्हाळ्यात केसांचं जर नीट पोषण झालं नाही तरमात्र केसांची एवढी हानी होते की ती नंतर इतर ॠतूतही भरून येत नाही. उन्हाळ्यात केसांना जीवनसत्त्वं आणि खनिजं हवी असतात. केसांच्या मुळांना हलक्या हातानं मसाज हवा असतो. आणि यासाठी मेडिकल स्टोअरमधली लोशन आणि सिरम गरजेची नसतात तर फळं-फूलं-पानांचा अर्क, दही दूध गरजेचं असतं. तेवढं जर दिलं तर उन्हाळ्यात केसांना रूक्षपणा येत नाही, केस मजबूत राहतात, केसांची चमक आणि मऊपणा टिकून राहू शकतो.