आज रविवार! आठवडाभर कामासाठी  बाहेर असलेल्या महिला आज घरी असणार. जर तुम्हाला आज  आपल्या कुंटूंबासाठी  काही स्पेशल पण पटकन होणारी डीश तयार करावीशी वाटत असेल तर आम्ही तुम्हाला एक स्पेशल कटलेटची रेसिपी सांगणार आहोत. नेहमी मुलं बाहेरचं खातात अशी जर तुमची तक्रार असेल तर हे कटलेट्स जर तुम्ही बनवाल तर घरातली लहानांपासून मोठी मंडळी तुमच्यावर खूश झाल्याशिवाय राहणार नाही. हे कटलेट तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीचा वापर करून तयार करू शकता. फक्त काही फ्रेश भाज्यांची आवश्यकता असणार आहे. ज्या आपण रोजच बाजारातून आणत असतो. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे पौष्टिक व्हेजिटेबल कटलेट.

Related imageसाहित्य:

Related image

१ शिजलेला बटाटा
१/२ कप मटार
१/४ कप गाजराचे तुकडे
१/४ कप फरसबीचे तुकडे
१ छोटा कांदा
१ टेस्पून लसूण पेस्ट
५ टेस्पून चणा पिठ
६-७ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार लाल तिखट
१ टिस्पून गरम मसाला
१ टिस्पून चाट मसाला
१ टिस्पून आमचूर पावडर
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ कप भाजलेला रवा
तेल, मीठ

Image result for vegetable cutlet
कृतीImage result for cutletकृती: 
मटार, गाजर, फरसबीचे तुकडे थोडे मीठ घालून वाफवून घ्यावेत. सर्व भाज्या चाळणीत काढून ठेवाव्यात जेणेकरून त्यातील अधिकचे पाणी निघून जाईल.
नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट व मिरच्या बारीक करून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा परतला कि त्यात चण्याचे पिठ घालावे, पिठ खमंग भाजून घ्यावे.

एका भांड्यात शिजलेला बटाटा किसून घ्यावा. त्यात सर्व वाफवलेल्या भाज्या, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ आणि भाजलेले चणा पिठ घालून एकत्र करावे. चणा पिठामुळे घट्टपणा येतो. पण कधी कधी बटाटा व इतर भाज्यांतील पाण्यामुळे जरा ओलसरपणा येण्याची शक्यता असते तेव्हा गरज वाटल्यास ब्रेड घालावा.
मिश्रणाचे समान भाग करून त्याला हाताने किंवा साच्याने आकार द्यावे. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये १-२ तेल गरम करत ठेवावे. कटलेटला भाजलेला रवा दोन्ही बाजूने लावून घ्यावा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन करून घ्यावे. तयार आहेत व्हेजीटेबल कटलेट.

(सौजन्य- http://chakali.blogspot.com/)

Web Title: How to make vegetable cutlet recipe at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.