झणझणीत, चविष्ट पाटवड्यांची भाजी.... खाल तर बोटं चाखत रहाल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 11:46 AM2019-12-02T11:46:50+5:302019-12-02T17:33:10+5:30

जेवणात रोज काय काय नवनवीन करावं. असा प्रश्न घरोघरच्या महिलांना पडत असतो.

How to make patvadya recipe | झणझणीत, चविष्ट पाटवड्यांची भाजी.... खाल तर बोटं चाखत रहाल.

झणझणीत, चविष्ट पाटवड्यांची भाजी.... खाल तर बोटं चाखत रहाल.

Next

जेवणात रोज काय काय नवनवीन करावं. असा प्रश्न घरोघरच्या महिलांना पडत असतो.  कारण त्याच त्याच  भाज्या आणि पाककृती ट्राय करून महिलांना आणि ते खाऊन  घरातल्या मंडळींना कंटाळा आलेला असतो.  जर तुम्ही सुध्दा असा विचार करत असाल तर एक नवीन रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून जास्त कोणताही खर्च न करता जेवणासाठी तुम्ही ही  भाजी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची पाटवड्यांची भाजी. 


(Image credit- You tube)

साहित्य :-
 हरभरा डाळीचं पिठ १ वाटी 
२ कांदे , १ टोमॅटो 
लसूण ४-५  पाकळ्या 
ओल खोबरे कीसुन २-३ चमचे
 हळद , काळा मसाला ३ चमचा लाल तिखट १ चमचा 
 मिठ , सुक खोबरे १/२ वाटी 
२ आल , कोथिंबीर 
 तेल .


कृती :- 
तेल टाकून त्यात एक वाटी डाळीचं पीठ खमंग भाजून घ्यावं 
त्यात मीठ , तिखट घालून थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर पिठल्यासारखं करावं.
 मिश्रण कडेनं सुटू लागले म्हणजे एका ताटाला तेलाचा हात लावून घ्यावा
 वरील मिश्रण त्यावर थापावं एकसारखं थाप्ल्यावर त्यावर किसलेलं ओल खोबरं आणि कोथिंबीर पेरावी व मोठया चौकोनी वड्या कापून घ्याव्या वड्या थंड झल्यावर त्या एका भांड्यामध्ये काढून घ्याव्यात . 

(Image credit-Youtube)

रस्साः

कांदा, खोबर भाजून घ्या टोमॅटो कापून, लसूण पाकळ्या ,आल ह्याच सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटण करा.

कढईत तेल टाकून १ बारीक चिरुन कांदा घालून गुलाबी करुन वरील वाटण घाला. तेल सुटले की काळा मसाला & लाल तिखट हे घालून मिक्स करून त्यात पाणी घालून चागंले ऊकळून घ्या रस्सा गरम , उकळता ठेवावा.

ही भाजी वाढताना आधी दोन वड्या ठेवून त्यावर रस्सा घालावा. खोबरं-कोथिंबीर पेरून किंवा आवडीप्रमाणे ही भाजी भाताबरोबर , भाकरी , चपाती सोबत खावी.


(सौजन्य-bred butter) 

Web Title: How to make patvadya recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.