शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी नाश्ता कशाचा करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:16 IST

बॉलिवूड सेलिब्रिटींची फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. तेही आपल्या फिटनेसबाबत खूप जागरुक असतात. त्यामुळे ते सकाळचा नाश्ताही त्याच अनुशंगाने करतात.

सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सकाळी पोटभर पण योग्य पदार्थांचा नाश्ता केल्यास तुम्ही फिट आणि दिवसभर एनर्जीने भरपूर राहू शकता. बॉलिवूडसेलिब्रिटींची फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. तेही आपल्या फिटनेसबाबत खूप जागरुक असतात. त्यामुळे ते सकाळचा नाश्ताही त्याच अनुशंगाने करतात. त्यांना फिटनेससाठी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करावं लागतं. चला जाणून घेऊ बॉलिवूडसेलिब्रिटी सकाळी काय नाश्ता करुन स्वत:ला फिट ठेवतात. 

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार भलेही ५० वर्षांचा झाला असेल पण आजही त्यांची एनर्जी आणि फिटनेस तरुणांना लाजवते. तसा तर अक्षय कुमार खाण्या-पिण्याच्या बाबतीत शौकीन आहे. पण सकाळी त्याचा नाश्ता हलका असतो. तो सकाळी नाश्त्यात ज्यूस, फळ आणि दूध घेतो. 

दीपिका पादुकोन

दीपिका पादुकोन बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री आहे. आज तिचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. तिच्या फिटनेस आणि परफेक्ट बॉडीचेही अनेक चाहते आहेत. पण यासाठी तिला फार काळजी घ्यावी लागते. त्यानुसार दीपिका सकाळी नाश्त्यामध्ये उपमा किंवा डोसा खाणे पसंत करते. तसेच ती नाश्त्यात अंडी आणि लो फॅट दूध घेते. 

हृतिक रोशन

बॉलिवूडमध्ये हृतिकच्या लूक्स आणि बॉडीला तोड नाहीये. अनेकजण त्याच्या फिटनेसपासून प्रभावित आहेत. तो सकाळी नाश्त्यामध्ये अंडी, ब्राउन ब्रेड, प्रोटीन शेक, नट्स, कॉर्न फ्लेक्स आणि दूध घेतो. 

करिना कपूर

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री या वजन वाढू नये म्हणून तूप खाणे टाळतात. पण करिना याबाबत वेगळी आहे. करिना दिवसाची सुरुवात कॉफीने करते. त्यासोबतच ती दही, पराठे खाते. 

रणबीर कपूर

पंजाबी परिवारातील रणबीर कपूर हा सुद्धा वेगवेगळ्या पदार्थांचा शौकीन आहे. तसे तर त्याला व्हेज-नॉनव्हेज दोन्ही पसंत आहेत. पण सकाळी तो हलका नाश्ता करतो. ज्यात ३ अंडी, ब्राउन ब्रेड, प्रोटीन शेक आणि बदाम यांचा समावेश असतो. 

प्रियांका चोप्रा

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत प्रियांकाने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. प्रियांकाच्या सुंदर आणि टोंड बॉडीचं गुपित तिच्या डाएट चार्टमध्ये लपलं आहे. सकाळी नाश्त्यामध्ये ती दोन अंडी किंवा ओटमील आणि स्किम्ड मिल्क घेते. 

मलायका अरोरा

मलायका अरोरा बॉलिवूडच्या त्या काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांचं वय अनेक वर्षांपासून एकाच जागी थांबलंय. मलायका सकाळी नाश्त्यामध्ये फळं, उपमा किंवा पोहे खाते. त्यानंतर लंचमध्ये ती भाज्या, चिकन आणि सॅलड खाते. 

टायगर श्रॉफ

बॉलिवूडचा नवा अॅक्शन हिरो टायगरही आपल्या फिटनेससाठी सध्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. टायगर सकाळी नाश्त्यामध्ये ८ अंडी खातो. महत्वाची बाब म्हणजे टायगर रोज आपलं वर्कआऊट रुटीन बदलतो.  

टॅग्स :bollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीAkshay Kumarअक्षय कुमारDeepika Padukoneदीपिका पादुकोणMalaika Arora Khanमलाइका अरोराtiger Shroffटायगर श्रॉफPriyanka Chopraप्रियांका चोप्रा