- पवित्रा कस्तुरेअमेरिकन जर्नल आॅफ क्लिनिकल न्युट्रिशन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार फर्टिलिटी आणि कॅल्शिअमचा संबंध असतो. वयाच्या तिशीतल्या साधारण १ लाख २० हजार महिलांच्या डाएटचा अभ्यास करुन त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. तसंही महिलांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम हा महत्वाचा घटक आहेत. हाडं, शरीराची ठेवण, रक्ताच्या गाठी होणं, मसल्सची लवचिकता यासाऱ्यासाठी त्याचा उपयोग होतो. मात्र प्रजननक्षमतेशी त्याचा संबंध प्रथमच जोडून पाहण्यात आला आहे.व्हीटॅमिन डी आणि कॅल्शिअम इनटेकचा प्रजनन क्षमतेशी काही संबंध असतो असं आजवरचे अभ्यासात तपासण्यात आलं नव्हतं असं सांगून डॉक्टर अलेक्झाण्ड्रा परड्यू स्मिथ लिहितात की, या अभ्यासात मात्र आम्हाला असं दिसलं की ज्या महिलांच्या आहारात कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी जास्त त्यांचे मेनॉपॉज लांबतात. प्रजननक्षमता अधिक असते. मात्र त्यांची कमतरता असणाऱ्या महिलांना मेनॉपॉज लवकरत येतो.वर्तमानकाळात या साऱ्याचं महत्व जास्त आहे कारण महिलांचं उशीरा विवाह करण्याचं प्रमाण वाढतं आहे. त्यातून मातृत्वाचं वयही वाढतं आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देताना कॅल्शिअमयुक्त चौरस आहार आणि सोबत ग्लासभर दूध प्यायला हवं.
मेनॉपॉज लांबवायचाय? रोज एक ग्लास दूध प्या..
By admin | Updated: June 9, 2017 19:16 IST