शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Utsav Special Recipe : असे तयार करा बाप्पासाठी केसरी मोदक; चवीसोबतच आरोग्यासाठी ठरतात उत्तम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 13:51 IST

गणेशोत्सवात घराघरांत बाप्पाचं आगमन होतं. बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तर हमखास तयार केले जातात. पण अनेकदा उकडीचे मोदक करून कंटाळा येतो. अशातच तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने मोदक तयार करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही केशरी मोदक ट्राय करू शकता. 

गणेशोत्सवात घराघरांत बाप्पाचं आगमन होतं. बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तर हमखास तयार केले जातात. पण अनेकदा उकडीचे मोदक करून कंटाळा येतो. अशातच तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने मोदक तयार करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही केशरी मोदक ट्राय करू शकता. 

वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात येणारे हे मोदक चवीला उत्तम असतात. तसेच यामध्ये ड्रायफ्रुट्सचा वापर करण्यात येत असल्यामुळे अनेक पोषक तत्वही असतात. या मोदकांची सर्वात खास गोष्ट म्हणजे, हे तयार करणं अत्यंत सोप असतं. जाणून घेऊया केशरी मोदक तयार करण्याची रेसिपी... 

केशरी मोदक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :

  • खवा
  • वेलची पूड 
  • केशर आवश्यकतेनुसार
  • पिठी साखर 
  • ड्रायफ्रुट्स 
  • तेल 

 

केशरी मोदक तयार करण्याची कृती : 

- गॅसवर एक पॅन ठेवून मध्यम आचेवर गरम करत ठेवा. 

- फॅन गरम झाल्यानंतर किसलेला खवा आणि पिठी साखर एकत्र करा. 

- 5 ते 10 मिनिटांसाठी परतून घ्या. लक्षात ठेवा की, साखर पूर्णपणे विरघळणं आवश्यक आहे. 

- मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर खवा व्यवस्थित एकत्र करून गॅस बंद करा. त्यामध्ये वेलची पूड एकत्र करून मिश्रण थंड होण्यास ठेवा. 

- तयार मिश्रण दोन बाउलमध्ये काढून घ्या. एका बाउलमधील मिश्रणात ड्रायफ्रुट्स एकत्र करा तर दुसऱ्या भागामध्ये केशर एकत्र करा. 

- आता मोदकांचा साचा घेऊन एका बाउलमधील मिश्रण घेऊन त्याला अर्धवर्तुळाकार देऊन साच्यामध्ये टाका. आता दुसऱ्या बाउलमधील मिश्रण घेऊन साच्यातील उरलेल्या भागामध्ये एकत्र करा. 

- असं केल्याने मोदकाचा अर्धा भाग केशरी आणि अर्ध्या भागामध्ये ड्रायफ्रुट्स असा मोदक तयार होइल. 

- टेस्टी आणि हेल्दी केशरी मोदक तयार आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपीReceipeपाककृती