शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Oath-Taking Ceremony Live: नरेंद्र मोदी PM पदाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज; ६९ खासदार घेणार मंत्रिपदाची शपथ
2
गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?
3
नारायण राणे, स्मृती इराणी, अन्...; या कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत मोदी सरकार 2.0 मधील हे 20 दिग्गज चेहरे?
4
राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण
5
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
6
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
7
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
8
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
9
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
10
'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक
11
'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर
12
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची संभाव्य तारीख आली समोर! पण, मोदी सरकारमुळे पाकिस्तानची कोंडी 
13
"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा
14
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन
15
Sunita Rajwar : "मी खूप संघर्ष केला, आई-वडिलांनी..."; ट्रक ड्रायव्हरची मुलगी बनली लोकप्रिय अभिनेत्री
16
जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका
17
Jayant Patil : "समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला"
18
VIDEO: मुंबई विमानतळावर वाचला शेकडो प्रवाशांचा जीव! थोडक्यात टळली दोन विमानांची धडक
19
"हँडसम आफ्रिदी...", नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी पाकिस्तानी खेळाडूचा संवाद Viral
20
मोदी सरकारमध्ये उत्तर प्रदेशमधून कुणाकुणाला संधी? ही नावं येताहेत समोर   

Ganesh Chaturthi 2019 : जास्त वेळ न घालवता असे झटपट तयार करा उकडीचे मोदक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 4:18 PM

भेसळयुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासाठी विघ्नहर्त्याला घरीच आपल्या हाताने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं कधीही उत्तमच. गणरायाच्या नैवेद्यासाठी घराघरात उकडीच्या मोदकांचा घाट घातला जातो.

प्रतिष्ठापनेनंतर बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. अनेकदा हे मोदक बाजारातून विकत आणले जातात. पण फेस्टिव्ह सिझनमध्ये बाजारात मिळणाऱ्या मिठाईमध्ये भेसळ आढळून येते. या भेसळयुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासाठी विघ्नहर्त्याला घरीच आपल्या हाताने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं कधीही उत्तमच. गणरायाच्या नैवेद्यासाठी घराघरात उकडीच्या मोदकांचा घाट घातला जातो. अनेकदा व्यवस्थित मोदकांचा बेत फसतो. आज आम्ही तुम्हाला सोपी आणि झटपट होणारी उकडीच्या मोदकांची रेसिपी सांगणार आहोत. 

उकडीच्या मोदकांसाठी लागणारं साहित्य :

  • ४ वाट्या तांदळाची पिठी
  • ३ वाट्या पाणी
  • १ पळी तेल
  • १ लहान चमचा साजूक तूप
  • चवीपुरते मीठ
  • १ वाटी ओलं खोबरं
  • पाऊण वाटी चिरलेला गूळ

उकडीचे मोदक तयार करण्याची कृती :

- एका भांड्यामध्ये तूप घ्या. 

- त्यामध्ये खवलेलं खोबरं आणि गूळ एकत्र करून शिजवून घ्या.

- प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा.

- थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. 

- पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदळाची पिठी घाला. 

- नीट एकत्र करून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ घ्या. 

- थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्या.

- उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मध्ये घोळवून घ्या.

- उकडीला खोलगट वाटीचा आकार द्या.

- त्यामध्ये खोबरं आणि गुळाचं शिजवलेलं सारण भरा.

- त्यानंतर वाटीला एक एक करून पाकळ्या काढा. पाकळ्या जितक्या जवळ आणि सारख्या अंतरावर असतील तेवढा मोदक आकर्षक दिसेल.

- त्यानंतर तळव्यावर ठेवून बोटांच्या साहाय्याने पाकळ्या बंद करून वरच्या बाजूला टोक ठेवा.

- रेखीव आणि मुलायम उकडीचे मोदक बाप्पासाठी तयार आहेत. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवReceipeपाककृतीGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपी