शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी रिकाम्यापोटी मनुके खा; आरोग्यासाठी होतात अनेक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 19:26 IST

ड्रायफ्रुट्समध्ये समाविष्ट होणारे मनुके आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. आपण अनेकदा गोड पदार्थांमध्ये किंवा पुलाव तयार करताना त्यामध्ये मनुक्यांचा वापर करतो. पण हे मनुके तुम्ही कधी अनोशापोटी खाल्ले आहेत का?

ड्रायफ्रुट्समध्ये समाविष्ट होणारे मनुके आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. आपण अनेकदा गोड पदार्थांमध्ये किंवा पुलाव तयार करताना त्यामध्ये मनुक्यांचा वापर करतो. पण हे मनुके तुम्ही कधी अनोशापोटी खाल्ले आहेत का? मनुक्यांमध्ये हेल्दी गुणधर्म असतात. यामध्ये आयर्न, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. जे शरीराच्या विविध समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. सकाळी उठल्यानंतर अनोशापोटी 5 ते 10 मनुके खाल्यानंतर पाणी प्या. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल. जाणून घेऊया रिकाम्यापोटी मनुके खाण्याचे फायदे...

- अनोशापोटी मनुके खाल्याने यामध्ये असणारे अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासोबतच घशाचं इन्फेक्शन दूर करण्यासाठीही मदत करतो. 

- पोटाच्या समस्या, बद्धकोष्ट यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर रात्री 8 ते 10 मनुके एका ग्लासामध्ये भिजत ठेवा. सकाळी अनोशापोटी हे पाणी मनुक्यांसोबत पिऊन टाका. यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत होण्यासाठीही मदत होते. 

- रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मनुके फायदेशीर ठरतात. कारण यांमध्ये ती सर्व पोषक तत्व असतात, जी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. 

- हाडांना मजबूत करण्यासाठी मनुके सकाळी अनोशापोटी मनुके खाणं उत्तम ठरतं. यामध्ये फायबरसोबत कॅल्शिअम आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे शरीराची हाडांचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते. 

- रिकाम्यापोटी मनुके खाल्याने रक्त शुद्ध होण्यासोबतच लिव्हर, हार्ट आणि पचनक्रिया उत्तम होण्यास मदत होते. मनुक्यांमध्ये असणारे गुणधर्म पोटातील अ‍ॅसिड कमी करण्यासाठी मदत करतात. यामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असतं, जे शरीरामधील रक्त वाढविण्यासाठी मदत करतं. 

- रिकाम्या पोटी मनुक्यांचे पाणी प्यायल्याने नियमितपणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे लिव्हर आणि किडनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत मिळते. 

- मनुक्याच्या पाण्यामध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए आणि बीटा केरोटिन यांसारखी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. जी डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी मदत करतात. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स