फणसाचे फक्त गरेच खाऊ नका तर; खा फणसाची मसालेदार बिर्याणी आणि आंबटगोड लोणचंही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 20:41 IST2021-05-07T20:33:21+5:302021-05-07T20:41:23+5:30
फणसाचे गरे म्हटल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेलच. कोकणचा हा स्वादिष्ट मेवा जगात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला जातो. फणसाच्या या चवदार रेसिपिज खास तुमच्यासाठी...

फणसाचे फक्त गरेच खाऊ नका तर; खा फणसाची मसालेदार बिर्याणी आणि आंबटगोड लोणचंही
फणस हे कोकणचेच वैभव आहेच पण इतरही ठिकाणी हे फळ आवडीने खाल्ले जाते. पण फणसापासून बनणाऱ्या रेसिपीस तुम्हाला माहित आहेत का? फणसापासून तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतक्या स्वादिष्ट रेसिपिज आहेत. यापैकी काही आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
फणसाची आमटी- फणस, कांदा आणि टॉमेटोचा वापर करून हा आमटी बनवली जाते. यात विविध मसाले घातले जातात. ही आमटी थोडी जाडसरच छान लागते. चपाती किंवा भाकरी सोबत खाल्ल्यावर याची चव तुमच्या जीभेवर रेंगाळतच राहिल.
फणसाची बिर्याणी- तुम्ही शाकाहारी असाल आणि बिर्याणी खावीशी वाटत असेल तर फणसाची बिर्याणी नक्की ट्राय करा. बनवायला झटपट आणि सोपी, खायला उत्तम अशी ही बिर्याणी आहे. त्यासोबत कोशिंबीर असली तर सोने पे सुहागा.
फणसाचे लोणचे- तिखट आणि आंबटगोड फणसाच्या लोणच्याच्या फोडी तु्म्ही तोंडात टाकताच विरघळतील. तेल, हळद, तिखट आणि राई याचा वापर करून हे लोणचे तुम्ही घरच्याघरी बनवू शकता.
पान्सा पोट्टु कुरा- या डिशचे नाव जितके भन्नाट तितकीच ती खायलाही तितकीच चवदार. इतकेच नव्हे तर ही डिश विविध जीवनसत्वांनीयुक्त अशी. फणसाच्या फोडी मसाल्यात मूरवून पुन्हा शेगडीवर विविध मसाल्यांसोबत शिजवून ही डिश तयार केली जाते.