भूक लागली की मुलांना बाहेरचा चटक मटक खाऊच देता का? मग हे घरच्या चवीचे पदार्थ करून खाऊ घालाच. मुलं पिझ्झा बर्गर नक्की विसरतील!
By Admin | Updated: June 6, 2017 18:04 IST2017-06-06T18:04:23+5:302017-06-06T18:04:23+5:30
बाहेर पिझ्झा बर्गर झटपट मिळतात पण आई-आजीनं केलेल्या पोटभरीच्या खाऊला मात्र कशाचीच सर नाही.
भूक लागली की मुलांना बाहेरचा चटक मटक खाऊच देता का? मग हे घरच्या चवीचे पदार्थ करून खाऊ घालाच. मुलं पिझ्झा बर्गर नक्की विसरतील!
-सारिका पूरकर-गुजराथी
हॉटेलिंग आता अंगवळणी पडलंय साऱ्यांच्याच. पण तरीही घरच्या चवीला आणि पदार्थांना पर्याय नाही हेच खरं. आज भूक लागली तर बाहेर पिझ्झा बर्गर झटपट मिळतात पण आई-आजीनं केलेल्या पोटभरीच्या खाऊला मात्र कशाचीच सर नाही. आज अनेक घरात हे पदार्थ केले जात नाहीत पण त्याच्या चवी आजही जीभेवर आहेत.
मुलांनी खाऊ मागितला की दुकानातलाच खाऊ का आठवतो? आपल्या लहानपणी आपल्याला आई आजी जो खाऊ द्यायची तो आपल्या मुलांसाठीही करून बघा की. मुलांच्या भुकेचा प्रश्न सुटेल आणि महत्त्वाचं म्हणज घरी बनणारा हा पौष्टिक खाऊ मुलांचाही फेव्हरिट होइल. असं म्हणतात मुलांना सर्व प्रकारच्या चवींची ओळख करून द्यावी त्यातूनच मुलांची टेस्ट तयार होते. ‘आमच्या मुलांना काय बाहेरचंच आवडतं’असं त्यांच्या आवडीविषयी सांगण्याआधी आपण मुलांना घरचा खाऊ आवडीनं खाऊ घातलाय का? याचा विचार आधी करा. आणि नाही असं उत्तर आलं तर हा घरचा खाऊ नक्की करून बघा. तुमच्याप्रमाणेच तुमच्या मुलांचाही तो आॅलटाइम फेव्हरिट होईल हे नक्की!
१) गुळपापडी
गुळपापडी आठवते आणि आवडतेही पण खाऊन किती दिवस झाले ते कोणी सांगेल का? महिने की वर्ष? असो. गव्हाची कणिक, साजूक तूप आणि गुळ या अवघ्या तीन घटकांची ही करामत आहे. कोरडी गुळपापडीही असते. कणिक तूपावर भाजून त्याला गुळ चोळून ठेवायचा आंओ गार झाले की हपके मारायचे तोंडात. गुळाऐवजी साखरही घातली तरी चालते. गुळ आणि कणिक पौष्टिक असतातच. त्यापासून बनलेली गुळपापडी ही पौष्टिक तर असतेच शिवाय चविष्टही असते.