कपातला केक अन पिझ्झाही कपातला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 17:11 IST2017-04-25T17:03:16+5:302017-04-25T17:11:30+5:30

कपातून दूध, चहा, कॉफी पितात यात नवीन काय?पण याव्यतिरिक्तही आता कपात खाण्यासारखं खूप काही आहे. कपातल्या खाऊची फॅशनच झाली आहे म्हणाना !

Cut cake and pizza cut! | कपातला केक अन पिझ्झाही कपातला!

कपातला केक अन पिझ्झाही कपातला!

 

- भक्ती सोमण

कपातून दूध, चहा, कॉफी पितात यात नवीन काय? रोजचं करतो ना आपण तसं. पण कपातून खाणंही आता सुरू झालं आहे. कोणी म्हणेल यातही काय नवीन आहे? कपातल्या चहात बिस्किटं, टोस्ट, खारी नाहीतर पोळी बुडवून आपण एरवीही खातोच की. पण याव्यतिरिक्तही आता कपात खाण्यासारखं खूप काही आहे. कपातल्या खाऊची फॅशनच झाली आहे म्हणाना ! तर आता कपात केक आणि पिझ्झा खाता येऊ शकतो. मायक्रोव्हेव्ह मध्ये गरम होऊ शकतील अशा कपात मात्र या गोष्टी करायच्या. केकसाठी लागणारा मैदा, दूध, क्रीम, कन्डेन्स मिल्क असे आवडीचे प्रकार एकत्र करून ते कपात ठेवून मायक्रोव्हेवमध्ये बेक करायचे. तो केक कपातच छान फुलतो. मग त्यावर क्रीम, चॉकलेट, ड्रायफ्रूट यानं सजवायचं. सध्या असे केक फार मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत.      

 

           

Web Title: Cut cake and pizza cut!