शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
2
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
3
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
4
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
5
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
6
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
7
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
8
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
9
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
10
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
11
"त्याला कशाला दोष देता?"; सुनील गावसकरांनी घेतली गौतम गंभीरची बाजू, दोषी कोण तेही सांगितलं
12
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
13
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
14
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
15
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
16
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
17
एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट
18
लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उपराज्यपालांकडून 'हे' अधिकार काढून घेतले...
19
"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला
20
बँक ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद; सलग ५ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामे खोळंबणार!
Daily Top 2Weekly Top 5

भूक कमी झाली असेल तर नियमित करा शेपूच्या भाजीचं सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 12:59 IST

हिवाळ्यात वेगवेगळे पदार्थ खाण्याची वेगळीच मजा असते. पण कधी कधी जास्त मसालेदार किंवा वेगवेगळे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटात जळजळ, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ लागते.

हिवाळ्यात वेगवेगळे पदार्थ खाण्याची वेगळीच मजा असते. पण कधी कधी जास्त मसालेदार किंवा वेगवेगळे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटात जळजळ, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ लागते. असं होत असेल तर समजा की, तुमच्या पोटातील तापमानात गडबड झाली आहे. यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही असा आहार घ्या ज्यात नैसर्गिक तेल आणि पाणी असावे. यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे शेपूची भाजी.

शेपूच्या भाजीचा वापर पूर्वीपासून औषध म्हणून केला जातो. भारतीय घरांमध्ये शेपूचा वापर भाजीसाठीही केला जातो. आवडीने ही भाजी खाल्ली जाते. हिवाळ्यात शेपूची भाजी फारच फायदेशीर मानली जाते. कारण या भाजीमुळे वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत होते. अनेकांना शेपूची भाजी आवडते तर काहींना आवडत नाही. पण हे फायदे वाचल्यावर शेपूची भाजी खाणे नक्कीच सुरु करतील.

पचनक्रिया होते चांगली

शेपूचा वापर पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी केला जातो. ज्यात भूक कमी लागणे, पोट फुगणे, यकृताची समस्या आणि पित्ताशयाची समस्या यांचा समावेश आहे. तसेच याने मूत्राशयाशी संबंधी समस्या, मुतखड्याची समस्या दूर केल्या जातात. त्यासोबतच सर्दी-खोकला, ताप, संक्रमण, वेदना, अल्सर, मासिक पाळीतील समस्या, झोप कमी लागणे याही समस्या दूर करण्यास मदत मिळते. 

शेपूची भाजी खाण्याचे फायदे

शेपूच्या भाजीमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असल्याने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी राहतं. तसेच यात अनेकप्रकारचे अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन, जसे की, पिरिडॉक्सिन आणि नियासीन, त्यासोबतच फायबरही असतात. याने रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवला जातो. शेपूच्या भाजीच्या पानांमध्ये आणि बियांमध्ये लायमोनीन व युजीनॉलसारखं आवश्यक तेल आढळतं. या तेलामुळे शुगरचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. ही भाजी डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानली जाते. 

या भाजीपासून तयार तेलामुळे वात, पचन आणि कीटाणूनाशक गुण असतात. त्यासोबतच शेपूमध्ये रायबोफ्लेविन, फोलिक अॅसिड, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, नियासीन आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतात. ही सगळीच तत्व शरीराच्या मेटाबॉलिज्मसाठी आवश्यक असतात. 

शेपूच्या भाजीचा कॅल्शिअमचं प्रमाण वाढवून हाडं मजबूत करणे आणि हाडांचं होणारं नुकसान रोखणे यासाठीही होतो. ऑस्टियोपोसोसिसची समस्या कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होते. त्यामुळे शेपूच्या भाजीचं नियमीत सेवन केल्यास ऑस्टियोपोरोसिस आजार रोखला जाऊ शकतो. तसेच यातील अॅंटी-बॅक्टेरिअल तत्वामुळे संक्रमणासोबत लढण्याची ताकदही वाढते. 

तसेच, शेपूच्या भाजीमध्ये असलेल्या गुणांमुळे पचनक्रियेतही सुधारणा होते. याने तोडांची येणारी दुर्गंधीही कमी केली जाऊ शकते. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्याही याने दूर होण्यास मदत मिळते. डायरियापासून बचाव, पोट दुखणे आणि आतड्यांमधील गॅस कमी करणे हे फायदे होतात.

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स