आपण आहारात अनेक घटकांचा समावेश  करत असतो पण त्याचे फायदे आपल्याला माहित नसतात. पण ज्या गोष्टीकडे आपण आहारात लक्ष सुद्धा देत नाही अशा गोष्टी उपयुक्त ठरू शकतात. गुळ आणि चणे खाण्याचे फायदे खूप आहेत. पण जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र मिसळून खाल्या तर आरोग्याला लाभदायक ठरत असतात.

Image result for gul and chana

या दोन्ही पदार्थात मोठ्या प्रमाणवार आर्यन असतं. त्याचसोबत प्रोटीन सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात.  सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की  या दोन्ही पदार्थांची किंमत अत्यंत कमी असते.  अगदी कमी किंमतीत या पदार्थांचं सेवन करून तुम्ही  शरीराला आवश्यक असणारे घटक सहज मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला  गुळ आणि भाजलेले चणे खाल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात ते सांगणार आहोत. ( हे पण वाचा-व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध!)

आर्यनचे प्रमाण जास्त असतं

Image result for gul and chana

गुळामध्ये सर्वाधिक आयर्न असतं आणि अनीमिया शरीरात होणाऱ्या आयर्नच्या कमतरतेमुळे होतो. त्यामुळे गूळ खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. गुळामध्ये फक्त आयर्नच नाहीतर सोडिअम, पोटॅशिअम आणि अनेक व्हिटॅमिन्स असतात. दररोज जर डाएटमध्ये गुळाचा समावेश केला तर यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच गूळ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. ( हे पण वाचा-ऑफिसमधील कामाचा स्ट्रेस दूर करायचाय? असं करा मॅनेजमेंट...)

कॅल्शियम आणि व्हिटामीन असतं

Image result for gul and chana

चण्यांमध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्स असतचं. तसंच फॉस्फरस, प्रोटीन आणि आयर्नदेखील मुबलक प्रमाणात असतं. म्हणजेच, चण्यांचं सेवन केल्यानं शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चणे शरीरातील रक्ताच्या पेशी तयार करण्यासाठी मदत करतात. एवढचं नाहीतर किडनीसाठी अत्यंत फायदेशीर असतं. 

झिंकचं प्रमाण 

Image result for gul and chana

चणे आणि गुळामध्ये झिंक मोठ्या प्रमाणावर असतं आणि हे त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर यामध्ये आढळून येणारं व्हिटॅमिन बी 6 मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. त्वचेचा रंग उजळण्याासाठी फायदेशीर ठरतं असतात.

पचनास फायदेशीर

चणे आणि गुळामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबरर्स असतात. त्यामुळे पचक्रिया चांगली राहते पचनास आवश्यक असणारे घटक त्यात असतात. त्यामुळे चणे आणि गूळ खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं. ज्या लोकांना पोट साफ न होण्याची समस्या जाणवत असते अशा लोकांनी जर चणे आणि गुळाचे  सेवन केले तर पोट साफ होते.  अपचनाचा त्रास होत नाही. 

मसल्स बळकट होतात

Image result for gul and chana

चणे आणि गूळ एकत्र खाल्ल्याने मसल्स मजबूत होण्यास मदत होते. चणे आणि गूळातील प्रोटीन घटक नैसर्गिकरित्या आणि आरोग्यदायी मार्गाने तुमचे मसल्स बनवण्यासाठी मदत करतात. चणे सहज आणि कमी किमतीत उपलब्ध असल्यामुळे आपल्याला कधीही याचं सेवन करणं फायदेशीर ठरत असतं. 

Web Title: Benefits of eating rosted chana and jaggery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.