'एका बाईनेच माझ्या ब्रेस्टला स्पर्श केला तेव्हा...', संजीदा शेखने सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 17:04 IST2024-06-02T17:03:43+5:302024-06-02T17:04:47+5:30

पुरुषच नाही तर स्त्रियाही काही कमी नाहीत, संजीदा शेखने सांगितला वाईट अनुभव

Sanjeeda Shaikh recalls horrific incident when a woman touched her breasts in night club | 'एका बाईनेच माझ्या ब्रेस्टला स्पर्श केला तेव्हा...', संजीदा शेखने सांगितला धक्कादायक अनुभव

'एका बाईनेच माझ्या ब्रेस्टला स्पर्श केला तेव्हा...', संजीदा शेखने सांगितला धक्कादायक अनुभव

टीव्ही अभिनेत्री ते आता बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावू पाहणारी अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh). संजीदा सध्या संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी:द डायमंड बाजार' वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. यात ती वहीदाच्या भूमिकेत दिसली. तिच्या अभिनयाचं सध्या सगळीकडून कौतुक होत आहे. सीरिजच्या यशानंतर संजीदाने एका मुलाखतीत तिला वैयक्तिक आयुष्यात आलेला एक भयंकर किस्सा सांगितला.

'हीरामंडी'  सीरिजमध्ये संजीदा वेश्या व्यवसाय करणाऱ्या हीरामंडीतील महिलेच्या भूमिकेत आहे. तेथील महिलांचं आयुष्य या सीरिजमध्ये सर्व अभिनेत्रींनी दाखवलं आहे. Hautterfly ला दिलेल्या मुलाखतीत संजीदाने तिला आलेल्या एका भयानक अनुभवाविषयी सांगितलं. ती म्हणाली, "मला एक घटना धुसरशी आठवते. एका मुलीने माझ्यासोबत तसं केलं होतं. मी नाईटक्लबमध्ये होते. एक मुलगी माझ्याजवळून गेली तेव्हा तिने माझ्या ब्रेस्टला हात लावला आणि मग ती निघून गेली. मी काही सेकंद शॉकच झाले. मला कळतच नव्हतं की हे काय झालं? आपण ऐकतो की पुरुष विचित्र वागतात, हात लावतात पण स्त्रियाही काही कमी नाहीत."

संजीदाने 'हीरामंडी' आधी हृतिक रोशनच्या 'फायटर' सिनेमात काम केलं होतं. सध्या ती आणखी काही हिंदी प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. संजीदा आणि आमिर अली यांचा २०२२ साली घटस्फोट झाला. त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले होते जिचा आता संजीदा सांभाळ करत आहे. त आमिरशी घटस्फोट झाल्यानंतर ती स्वत:ला नशीबवान समजते. डिप्रेशनमधून बाहेर आल्याचंही ती म्हणाली होती. 

Web Title: Sanjeeda Shaikh recalls horrific incident when a woman touched her breasts in night club