पहिल्यांदाच समोर आले हे सत्य,नऊ वर्षांचा होईपर्यंत सलमान करायचा 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 13:56 IST2017-12-22T08:12:38+5:302017-12-22T13:56:45+5:30

सेलिब्रिटींचं विश्व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनातली गुपितं आणि बरंच काही जाणून घेण्याची रसिकांना इच्छा असते. त्याच्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक ...

The truth is that for the first time, Salman has to work till he is nine. | पहिल्यांदाच समोर आले हे सत्य,नऊ वर्षांचा होईपर्यंत सलमान करायचा 'हे' काम!

पहिल्यांदाच समोर आले हे सत्य,नऊ वर्षांचा होईपर्यंत सलमान करायचा 'हे' काम!

लिब्रिटींचं विश्व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनातली गुपितं आणि बरंच काही जाणून घेण्याची रसिकांना इच्छा असते. त्याच्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक बाबींची माहिती रसिकांना हवी असते.आणि त्यातही सलमान खानच्या खासगी आयुष्यातली कोणती गोष्ट कळली तर मग विचारायलाच नको.त्या गोष्टी तुफान चर्चा झाली म्हणून समजायचे.आता अशी काहीसे रहस्य खुद्द सलमान खाननेच उघड केले आहे.'टायगर जिंदा है' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान खान 'सुपर डान्सर चॅप्टर 2'च्या सेटवर हजेरी लावली होती.यावेळी सलमानने चिमुकल्या स्पर्धकांचे परफॉर्मन्स तर पाहिलेच मात्र त्यांच्यासोबत डान्स धम्मालही केली. बोलण्याच्या ओघात सलमानने मात्र या चिमुकल्यांसमोरच त्याच्या लहानपणीचा एक किस्सा सांगताच  सारेच थक्क झाल्याचे पाहायला मिळाले.सलमान नऊ वर्षांचा होईपर्यंत रोज झोपेत गादी ओली करायचा.सलमान खानचे सगळ्या गोष्टींप्रमाणे ही गोष्टही पहिल्यांदाच बाहेर आली आहे.या शोमध्ये स्पर्धक आकाश विषयीची माहिती परिक्षकांनी सलमानला सांगताच सलमाननेही तो ही वयाच्या नऊ वर्षापर्यंत गादी ओली करायचा हे सांगताच एकच हशा पिकला होता.

Also Read:लहानपणी असा दिसायचा भाईजान सलमान, भावा-बहिणीसोबतचा बालपणीचा सल्लुमियाँनं फोटो सोशल मीडियावर केला शेअर

सलमान इतर गोष्टीपेक्षा लहान मुलांसोबत जास्त चांगला रमतो.त्याचे अनेक असे फोटो सोशल मीडियावर तो स्वतः शेअर करत असतो.सलमान खानला त्याचा भाचा अहिल सोबत वेळ घालवायला प्रचंड आवडतं.अर्पिता गरोदर असल्यापासून सलमान तिची काळजी घेत असायचा.सलमान खान कुठेही गेला तरी तो लहान मुलांसोबत रमलेला आपल्याला दिसतो.त्याचा अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘सुल्तान’ चित्रपटाच्या सेटवर तो काही शाळांच्या मुलांसोबत बोलताना दिसला.त्याने अनेक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्टही केले होते.सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर फार काही विशेष कमाई करू शकला नाही.पण,तो गॉसिपमुळे चर्चेत आला.यात सलमानने त्याचा छोटा सहकारी मॅटिन रे तंगूसोबत बरेचसे फोटो काढले होते.त्यामुळे पुन्हा एकदा 'टायगर जिंदा है'सिनेमाच्या निमित्ताने 'सुपर डान्सर चॅप्टर 2'च्या सेटवर पोहचलेला सलमान चिमुकल्यासोबत फुल ऑन धम्माल करताना दिसतो आहे.  

Web Title: The truth is that for the first time, Salman has to work till he is nine.