"मुलांचे वडील लग्नासाठी घरी मुलांच्या पत्रिका पाठवतात", जुई गडकरीचा खुलासा, म्हणाली- "मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:08 IST2025-06-13T13:07:35+5:302025-06-13T13:08:03+5:30

जुईला चाहत्यांकडूनही प्रचंड प्रेम मिळतं. अनेक जण लग्नासाठी मेसेज करतात. तर काही जण घरी मुलांच्या पत्रिका पाठवतात, असा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जुईने केला. 

tharal tar mag actress jui gadkari talk about marriage and future husband | "मुलांचे वडील लग्नासाठी घरी मुलांच्या पत्रिका पाठवतात", जुई गडकरीचा खुलासा, म्हणाली- "मला..."

"मुलांचे वडील लग्नासाठी घरी मुलांच्या पत्रिका पाठवतात", जुई गडकरीचा खुलासा, म्हणाली- "मला..."

जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'पुढचं पाऊल' मालिकेतून सोशिक सून बनून घराघरात पोहोचलेली जुई सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत स्मार्ट, हुशार आणि प्रेमळ सूनेची भूमिका साकारत आहे. जुईला चाहत्यांकडूनही प्रचंड प्रेम मिळतं. अनेक जण लग्नासाठी मेसेज करतात. तर काही जण घरी मुलांच्या पत्रिका पाठवतात, असा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जुईने केला. 

जुईने नुकतीच 'मराठी मनोरंजन विश्व' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत जुईने तिला कसा मुलगा हवाय, हेदेखील सांगितलं. ती म्हणाली, "मला सपोर्ट करणारा, सांभाळून घेणारा मुलगा हवाय. मला रोज बायोडेटा येतात. माझ्या मेल बॉक्समध्ये, इन्स्टाच्या DM मध्ये लोक मेसेज करतात. माझ्या कर्जतच्या घरी मुलांचे वडील त्यांच्या पत्रिका आणि बायोडेटा पाठवतात. मला ही गोष्ट खूप चांगली वाटते की उगाचच हॉटी वगैरे बोलण्यापेक्षा लोकांना मी त्यांची बायको किंवा बहीण म्हणून हवीये, माझ्यासाठी ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि माझ्या कामासाठीही ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. मला कोणासाठी हॉटी बनायचं नाही. प्रत्येक मुलाच्या नजरेत आदर मिळतो, हीच माझ्या कामाची पावती आहे". 


दरम्यान, जुई सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती साकारत असलेल्या सायली या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. जुईने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'पुढचं पाऊल', 'सरस्वती' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती. 

Web Title: tharal tar mag actress jui gadkari talk about marriage and future husband