​सनी बनली भाभीजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 10:33 IST2016-09-20T11:58:37+5:302016-09-23T10:33:54+5:30

भाभीजी घर पर है या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना सनी लिओनीची ...

Sunny bani sister-in-law | ​सनी बनली भाभीजी

​सनी बनली भाभीजी

भीजी घर पर है या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना सनी लिओनीची एंट्री पाहायला मिळणार आहे. सनी छोट्या पडद्यावर रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे. पण पहिल्यांदाच ती एका मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती विभूती, अनिता, अंगुरी आणि मनमोहन यांच्या परिसरात तिच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत येणार आहे. ती तिथे येऊन चित्रपटासाठी हिरोची निवड करणार आहे. त्यामुळे तिच्या एंट्रीनंतर प्रेक्षकांना खळखळून हसण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेत सनी एक नृत्यदेखील करणार आहे आणि विशेष म्हणजे या गाण्यात ती भाभीजीच्या वेशभूषेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Sunny bani sister-in-law