म्हणून दिलीप प्रभावळकर 15 वर्षानंतर येतायेत छोट्या पडद्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:07 IST2016-12-08T16:56:16+5:302016-12-08T17:07:15+5:30

'चुकभूल द्यावी घ्यावी' या दिलीप प्रभावळकरांच्या अजरामर  नाटकावर आधारित नविन मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे खुद्द ...

So after Dilip Prabhavalkar 15 years later on small screens? | म्हणून दिलीप प्रभावळकर 15 वर्षानंतर येतायेत छोट्या पडद्यावर?

म्हणून दिलीप प्रभावळकर 15 वर्षानंतर येतायेत छोट्या पडद्यावर?

'
;चुकभूल द्यावी घ्यावी' या दिलीप प्रभावळकरांच्या अजरामर  नाटकावर आधारित नविन मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे खुद्द दिलिप प्रभावळकर या मालिकेत भूमिका साकरणार असल्याचे कळतेय.यापूर्वी  रंगमंचावरील या नाटकाला रसिकांकडून भरभरून दाद मिळाली होती. आता रंगभूमीवरील हे नाटक छोट्या पडद्यावर कसे रंगणार याविषयी उत्सुकता असल्याचे दिलीप प्रभावळकरांनी सांगितले.यापूर्वी मालिकांच्या अनेक ऑफर्स त्यांना आल्या  होत्या. मात्र त्यांना एकाच पध्दतीच्या कामात अडकायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी आलेल्या ऑफर्सना नकार दिला. विशेष म्हणजे अभिनेत्री मनवा नाईक पहिल्यांदाच या मालिकेच्या निमित्ताने निर्माती म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण  करत आहे.'चुक भूल द्यावी घ्यावी' या नाटकाप्रमाणेच मालिकेतही काम करावे अशी मनवाची इच्छा होती त्यामुळे ही मालिका करण्यासा होकार दिल्याचे प्रभावळकरांनी सांगितले. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यामांमध्ये वेगवेगळे प्रयोग होतायेत. त्यामुळे हा नाटकांवर आधारित असणारी ही मालिका ऑनस्क्रीश कशी दिसणार याची उत्सुकता सा-यांनाच आहे.15 वर्षांपूर्वी 'श्रीयुत गंगाधर टीपरे' या मालिकेतील दिलीप प्रभावळरांनी साकारलेली आबा ही भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे. त्यामुळेच 'चुक भूल द्यावी घ्यावी' मालिकेच्या निमित्ताने तब्बल 15 वर्षानंतर दिलीप प्रभावळकर छोट्या पडद्यावर एंट्री करतायेत. मालिकेच्या निमित्ताने आता रंगभूमीवरील हा प्रयोग छोट्या पडद्यावर पाहणे रसिकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: So after Dilip Prabhavalkar 15 years later on small screens?