सैराटमध्ये.... आताच बया का बावरलाचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 01:33 IST2016-02-24T08:33:15+5:302016-02-24T01:33:15+5:30

                 चित्रपट रिलिज होण्यापुर्वी त्यातील एखादे गाणे हिट झाले कि बास तो ...

In Sairat .... Now, Baya Kya baavarala kaal ke liye | सैराटमध्ये.... आताच बया का बावरलाचा जलवा

सैराटमध्ये.... आताच बया का बावरलाचा जलवा


/>     
           चित्रपट रिलिज होण्यापुर्वी त्यातील एखादे गाणे हिट झाले कि बास तो चित्रपट मग केवळ त्या गाण्यासाठीच पाहिला जातो. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केली जाणारी प्रोमो साँग्ज सध्या भलतीच हिट होताना दिसतात. फ्रंड्रीमधील जीव झाला येडा पिसा या गाण्याने सगळ््यांनाच वेड लावले. ते गाणे काही चित्रपटात दिसले नाही परंतू त्याचा जलवा अजुनही कायम आहे. आता फ्रंड्रीचेच दिग्दर्शक नागराज मंजुळे त्यांच्या आगामी सैराट या सिनेमामध्ये असेच एक भन्नाट गाणे घेऊन येत आहेत. आता च बया का बावरल असे शब्द असलेले हे गाणे अजय-अतुल यांनी संगीतबध्द केले आहे. गाण्यातील शब्द अन त्याला असलेला गावरान बाज यामुळे गे साँग तरुणांना नक्कीच भुरळ पाडेल यात शंका नाही. 

Web Title: In Sairat .... Now, Baya Kya baavarala kaal ke liye