मुग्धाच्या सासरच्या मंडळींचा फोटो आला समोर; जाणून घ्या कोण-कोण आहे तिच्या सासरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 11:29 IST2023-12-21T11:28:21+5:302023-12-21T11:29:13+5:30

Mugdha vaishampayan: लग्नाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रथमेशने त्याच्या एकत्र कुटुंबाचा फोटो शेअर केला.

sa re ga ma pa fame couple prathamesh laghate and mugdha vaishampayan family details | मुग्धाच्या सासरच्या मंडळींचा फोटो आला समोर; जाणून घ्या कोण-कोण आहे तिच्या सासरी

मुग्धाच्या सासरच्या मंडळींचा फोटो आला समोर; जाणून घ्या कोण-कोण आहे तिच्या सासरी

मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन (mugdha vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (prathamesh laghate) ही जोडी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या घरी लग्नाची गडबड सुरु आहे. काल (२० डिसेंबर) प्रथमेश-मुग्धाच्या घरी हळदी समारंभ पार पडला आणि नुकताच त्यांच्याकडे ग्रहमखाचा विधी पार पडत आहे. विशेष म्हणजे ही जोडी सोशल मीडियावर त्यांच्या या सगळ्या सोहळ्यांचे फोटो शेअर करत आहेत. त्यामुळेच ही जोडी सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे हे फोटो पाहून मुग्धाच्या सासरची मंडळी कशी आहेत, प्रथमेशच्या कुटुंबात कोण-कोण आहे. असे प्रश्न नेटकऱ्यांना पडत आहेत. 

प्रथमेश आणि मुग्धाने त्यांच्या सगळ्या विधी, सोहळ्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या लग्नाचे सगळे अपडेट चाहत्यांना देत आहेत. यामध्येच मुग्धाच्या सासरच्या मंडळीचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवरुन मुग्धाच्या सासरी तिच्या कुटुंबात किती लोक आहेत याचा अंदाज लावता येत आहे.
 

मुग्धाप्रमाणेच प्रथमेशने सुद्धा इन्स्टाग्रामवर त्याच्या हळदी समारंभाचे आणि ग्रहमखाचे फोटो शेअर केले आहेत. यात पहिल्यांदाच त्याने त्याच्या आई-वडील आणि भावासोबत फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर मुग्धाच्या सासरी प्रथमेश व्यतिरिक्त तिचे सासू-सासरे आणि एक दीर असल्याचं दिसून येत आहे.
 

Web Title: sa re ga ma pa fame couple prathamesh laghate and mugdha vaishampayan family details