​‘ये है मोहब्बते’ मालिकेवर पाकिस्तानात बंदी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 13:19 IST2016-06-08T07:47:39+5:302016-06-08T13:19:56+5:30

स्टार प्लस या वाहिनीवरील ‘ये हे मोहब्बते’ ही मालिका देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. छोट्या पडद्यावरील भारतीय रसिकांसोबत परदेशातही या ...

Pakistan ban on 'Ye Hai Mohabbate' series? | ​‘ये है मोहब्बते’ मालिकेवर पाकिस्तानात बंदी ?

​‘ये है मोहब्बते’ मालिकेवर पाकिस्तानात बंदी ?

टार प्लस या वाहिनीवरील ‘ये हे मोहब्बते’ ही मालिका देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. छोट्या पडद्यावरील भारतीय रसिकांसोबत परदेशातही या मालिकेचे फॅन आहेत. मात्र बालाजी टेलिफिल्म्सची ही मालिका पाकिस्तानातील रसिकांनाही चांगलीच भावतेय.आता पाकिस्तानातील याच फॅन्सना ही मालिका पाहण्यापासून मुकावं लागण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील उर्दू 1 या वाहिनीवर ही मालिका प्रसारीत केली जाते. एक जून रोजी प्रसारीत झालेल्या या मालिकेतील भागात रमण (करण पटेल) आणि इशिता (दिव्यांका त्रिपाठी) यांच्यातील इंटिमेट सीन दाखवण्यात आला होता.पाकिस्तानातील मीडिया कायद्यानुसार अशा दृष्यांचं प्रसारण म्हणजे अश्लीलता असून त्याबाबत उर्दू 1 या वाहिनीला नोटीस बजावण्यात आलीय. ही मालिका कुटुंबाला एकत्रित पाहण्या योग्य नसल्याचं या नोटीशीत नमूद करण्यात आलंय.त्यामुळं 'ये हे मोहब्बते' या मालिकेवर पाकिस्तानात बंदी येण्याची दाट शक्यता आहे..   
 

Web Title: Pakistan ban on 'Ye Hai Mohabbate' series?