"उद्या यांची पोरं विदेशात असतील अन्...", नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्कर्ष शिंदेची पोस्ट; म्हणाला- "तुमच्या नावावर केसेस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:17 IST2025-03-18T15:14:13+5:302025-03-18T15:17:02+5:30

औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादाला नागुरात हिंसक वळण लागलं आणि या वादाचं रूपांतर दंगलीत झालं.

marathi singer utkarsh shinde share post on nagpur violence netizens react | "उद्या यांची पोरं विदेशात असतील अन्...", नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्कर्ष शिंदेची पोस्ट; म्हणाला- "तुमच्या नावावर केसेस..."

"उद्या यांची पोरं विदेशात असतील अन्...", नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्कर्ष शिंदेची पोस्ट; म्हणाला- "तुमच्या नावावर केसेस..."

Utkarsh Shinde: औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादाला नागुरात हिंसक वळण लागलं आणि या वादाचं रूपांतर दंगलीत झालं. सोमवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमध्ये काही समाजकंटकांनी शेकडो गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे रस्त्यावर काचांचा आणि दगडांचा अक्षरशः ढीग पडला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी अजूनही या परिसरात भयाण शांतता आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटले असून विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय तसेच मनोरंजन विश्वातील कलाकार यावर व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच नागपुरात निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर मराठमोळा गायक उत्कर्ष शिंदेने खास पोस्ट शेअर केली आहे.


उत्कर्ष शिंदेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नागपुरमधील दंगल सदृश्य परिस्थितीवर भाष्य करणारी कविता पोस्ट केली आहे. ही कविता त्याने इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यामध्ये लिहिलंय...

उद्या यांची पोरं विदेशात असतील
दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील...

ना शिक्षण,नोकरी,घर ना पैसा ना मान-सन्मान
फक्त कोर्टाच्या पायऱ्या दिसतील
दंगल करू नका मित्रांनो
तुमच्या नावावर फक्त केसेस असतील...

कसं होइल बहिणीचं लग्न - नरक होईल बायकोच जगणं
कसं कराल आईच म्हातारपण- कसं कराल बापाच कार्य
हाथ रिकामा खिसे रिकामे-खिशात दमडी नसतील
उद्या यांची पोर विदेशात असतील
दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील...

जन्म जगण्यासाठी आहे राजकारण्यांच्या त्या वार्ता नको
तुम्हीच सांगा तुमच्या घराला पुरूष कोणी करता नको ?
विचार करा भविष्याचा पिढ्या अंधारात बसतील
तुम्ही ठीक तर घरचे आनंदित तुमच्या नेहमी असतील
दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील...

रीबीत रहा -स्वाभिमानाने जगा तर लोक तुम्हाला पुजतील
जाति भेद भाषा प्रांत याने होईल सारा अशांत
समाज कंटक बनून राहाल -पोलीस घरत घुसतील
करावसं ही भोगल तुम्हीच -तेव्हा कोणीसोबत नसतील
उद्या यांची पोरं विदेशात असतील,
दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नवावर फक्त केसेस असतील...

दरम्यान, उत्कर्ष शिंदेने रचलेली ही कविता अनेकांना विचार करायला लावणारी आहे. सध्या त्याची ही पोस्ट सेशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत आपलं समर्थन दर्शवलं आहे. 

Web Title: marathi singer utkarsh shinde share post on nagpur violence netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.