मराठमोळ्या अभिनेत्रीची गुडन्यूज, लग्नानंतर 8 महिन्यातच राहिली गरोदर; डोहाळजेवणाचा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 15:48 IST2024-08-19T15:47:39+5:302024-08-19T15:48:40+5:30

तिने डोहाळजेवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

Marathi actress Pratima Deshpande pregnant after 8 months of marriage | मराठमोळ्या अभिनेत्रीची गुडन्यूज, लग्नानंतर 8 महिन्यातच राहिली गरोदर; डोहाळजेवणाचा Video

मराठमोळ्या अभिनेत्रीची गुडन्यूज, लग्नानंतर 8 महिन्यातच राहिली गरोदर; डोहाळजेवणाचा Video

मराठी मनोरंजनसृष्टीत काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री खुशबू तावडेने गुडन्यूज दिली. येत्या काही महिन्यात खुशबू दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. तिचं डोहाळजेवणही थाटात पार पडलं. आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर ८ च महिन्यात अभिनेत्री गरोदर राहिली आहे. तिने डोहाळजेवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

सन मराठीवर 'संत गजानन शेगावीचे' ही मालिका गाजली होती. यातील जानकीचे पात्र लोकप्रिय झाले होते. हे पात्र अभिनेत्री प्रतिमा देशपांडेने (Pratima Deshpande) साकारले होते. 23 डिसेंबर 2023 रोजी प्रतिमा लग्नबंधनात अडकली. तर आता आठ महिन्यातच तिने गुडन्यूज दिली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डोहाळजेवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या  व्हिडिओत घरातल्या सदस्यांनी थाटात तिच्या बेबी शॉवरची तयारी, सजावट केलेली दिसते. तर दागदागिने घालून हिरवी साडी घालून प्रतिमा नटून येते.  तिची ओटी भरण्यात आली. येणाऱ्या छोट्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

प्रतिमा देशपांडेने 'संत गजानन शेगावीचे' या मालिकेशिवाय 'अजूनही बरसात आहे', 'शुभमंगल ऑनलाइन' मध्येही काम केलं  आहे.  मालिका केल्यानंतर 'पाटील' या सिनेमातही ती झळकली. नंतर मात्र ती अभिनयापासून दुरावली. तिने स्वत:चं युट्यूब चॅनल सुरु केलं. यावर ती तिचे भारतभ्रमंतीचे व्हिडिओ पोस्ट करते. तिच्या चॅनलला उत्तम प्रतिसाद मिळतो.


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गिरनार पर्वतावर गेली होती. तेथील दत्त मंदिरात तिने समीप परांजपेसोबत साखरपुडा केला. समीप आणि प्रतिमा बऱ्याच वर्षांपासून डेट करत होते. समीप हा आर्किटेक्ट आहे. तोही बायकोला तिच्या व्हिडिओत हातभार लावतो. 

Web Title: Marathi actress Pratima Deshpande pregnant after 8 months of marriage