बायकोला सोडलं घरीच, लग्नाला ५ महिने पुर्ण होताच अभिनेत्याची सोलो बाईक राईड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 17:15 IST2024-07-09T17:15:06+5:302024-07-09T17:15:48+5:30

अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Leaving his wife at home, the actor's solo bike ride after 5 months of marriage | बायकोला सोडलं घरीच, लग्नाला ५ महिने पुर्ण होताच अभिनेत्याची सोलो बाईक राईड

बायकोला सोडलं घरीच, लग्नाला ५ महिने पुर्ण होताच अभिनेत्याची सोलो बाईक राईड

मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक कपल म्हणजे शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware).  ते दोघे  १ फेब्रुवारी रोजी लग्नबेडीत अडकले. त्यांचा विवाहसोहळा ठाणे येथील येऊरमधील एक्झॉटिका द ट्रॉपिकल रिट्रीट या रिसॉर्टमध्ये पार पडला होता. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा अजिंक्य आणि शिवानी चर्चेत आले आहेत.

लग्नाला पाच महिने पुर्ण होताच अजिंक्य हा सोलो राईडला गेला आहे. याचा एक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने एक मजेशीर गाणं जोडलं आहे. ज्यामध्ये "I Ask My Wife Can I Go For Ride She Said Nooooooooooo " असं ऐकायला येत आहे. या व्हिडीओवर शिवानीनेही 'I Said Nooooooooooo' अशी कमेंट केली आहे. एवढचं नाही तर चाहत्यांसह इतर मित्रमंडळीनींही मजेशीर कमेंट केल्याचं दिसून येत आहे.  

दरम्यान, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरेची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. तू जीवाला गुंतवावे या मालिकेत काम करत असताना त्यांची मैत्री झाली. मालिका संपल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. २०१५-१६ च्या दरम्यान त्यांच्या रिलेशनशिपला सुरूवात झाली. त्यानंतर वर्षभराने म्हणजेच साधारण २०१७ मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगितले. मात्र दोघांच्या घरातून नात्याला ठळक विरोध झाला होता. त्यांच्या घरच्यांनी दोघांना एकत्र राहून दाखवा असं सांगितले. ४ वर्षांनंतर घरच्यांनी त्यांचं नातं स्वीकारलं.  अखेर ३१ जानेवारीला साखरपुडा अन् १ फेब्रुवारीला त्यांनी लग्न केले.
 

Web Title: Leaving his wife at home, the actor's solo bike ride after 5 months of marriage