'भाग बकुल भाग'मालिकेतून दोन बायका फजिती ऐकाचा होणार साक्षात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 16:54 IST2017-03-23T11:24:51+5:302017-03-23T16:54:51+5:30

छोट्या पडद्यावर लवकरच एक नवी मालिका रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल होत आहे. या मालिकेचं नाव आहे 'भाग बकुल भाग'. ...

Interview with two wives of 'Bhag Bakul Part' will be heard | 'भाग बकुल भाग'मालिकेतून दोन बायका फजिती ऐकाचा होणार साक्षात्कार

'भाग बकुल भाग'मालिकेतून दोन बायका फजिती ऐकाचा होणार साक्षात्कार

ट्या पडद्यावर लवकरच एक नवी मालिका रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल होत आहे. या मालिकेचं नाव आहे 'भाग बकुल भाग'. या मालिकेत दोन महिला एका पुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील. हलकीफुलकी गंमतीशीर असलेल्या या मालिकेत अभिनेत्री हिबा नवाब आणि श्रुती रावत या दोघी प्रमुख भूमिका साकारत आहेत. या दोघीजणी बकुलच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत आहे असं तुम्हाला वाटेल. मात्र या दोघीही आधीच बकुळच्या जीवनात दाखल झाल्या आहेत. दोघीही बकुलच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेत हिबा टीना तर श्रुती जिग्नाची भूमिका साकारत आहे.या दोघीही बकुलच्या पत्नी असल्या तरी दोघींना एकमेंकींबद्दल काहीही माहित नाही. आपल्या पतीच्या जीवनात दुसरी कोणीतरी आहे याची पुसटशी कल्पनाही या दोघींनाही नाही.त्यामुळे बकुलवर त्या जीवापाड प्रेम करतात. मात्र दोघींना सांभाळता सांभाळता बकुलची भंबेरी उडते. बालकलाकार म्हणून भूमिका साकारणं असो किंवा आता एखादी व्यक्तीरेखा साकारणं असो दरवेळी विचारपूर्वक भूमिका निवडल्याचे हिबा सांगते. प्रत्येकवेळी वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याकडे आपला कल असल्याचे हिबाने स्पष्ट केले आहे. भाग बकुल भाग या मालिकेतही असाच एक आगळा वेगळा प्रयत्न केल्याचं हिबाने सांगितले आहे.रसिकांना हसवणं, त्याचं मनमुराद मनोरंजन करणं हे कलाकारासाठी सगळ्यात आव्हानात्मक काम असते याची हिबाला जाणीव आहे. हेच आव्हानात्मक काम 'भाग बकुल भाग' या मालिकेच्या निमित्ताने करणार असल्याचे हिबाने सांगितले आहे.हा एक नक्कीच आगळावेगळा अनुभव ठरेल आणि रसिकांसोबत स्वतःही या भूमिकेचा आनंद घेण्यासाठी आतुर असल्याचे हिबाने म्हटले आहे. रसिकांना हा आपला अनोखा प्रयत्न नक्कीच भावेल असा विश्वासही हिबानं व्यक्त केला आहे. दुसरीकडे या मालिकेत श्रुती रावत ही जिग्ना ही भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.प्रत्यक्ष जीवनात आपण जिग्नापेक्षा खूप खूप वेगळे असल्याचे श्रुतीने सांगितले आहे. त्यामुळे ही भूमिका साकारणे आपल्यासाठी खूप खूप आव्हानात्मक असल्याचे तिला वाटते.शिवाय ही भूमिका साकारताना कॉमिक टायमिंगवर लक्ष ठेवणंही कठीण आणि आव्हानात्मक असल्याचे श्रुतीने सांगितले.या भूमिकेतून आपली अभिनयक्षमता सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. एक कलाकार म्हणून आपली वाढ होण्यासाठी भाग बकुल भाग ही मालिका मैलाचा दगड ठरेल आणि रसिकांनाही आपली भूमिका नक्की आवडेल असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे. 

Web Title: Interview with two wives of 'Bhag Bakul Part' will be heard