कशी बनली वाहबीज कास्टींग डिरेक्टर? कोणाला मिळवून दिली मालिकेत काम करण्याची संधी? जाणून घेण्यासाठी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 15:55 IST2016-11-30T15:54:07+5:302016-11-30T15:55:09+5:30

कोणावरही पाहताक्षणीच छाप पडेल असे रूप लाभलेला अभिलाष कुमार  ‘बहू हमारी रजनी-कान्त’मालिकेत विक्रमच्या भूमिकेत आता प्रेक्षकांवर आपली मोहिनी टाकणार ...

How was the consignment casting director? Who got the opportunity to work in the series? Read to learn | कशी बनली वाहबीज कास्टींग डिरेक्टर? कोणाला मिळवून दिली मालिकेत काम करण्याची संधी? जाणून घेण्यासाठी वाचा

कशी बनली वाहबीज कास्टींग डिरेक्टर? कोणाला मिळवून दिली मालिकेत काम करण्याची संधी? जाणून घेण्यासाठी वाचा

णावरही पाहताक्षणीच छाप पडेल असे रूप लाभलेला अभिलाष कुमार  ‘बहू हमारी रजनी-कान्त’मालिकेत विक्रमच्या भूमिकेत आता प्रेक्षकांवर आपली मोहिनी टाकणार आहे. परंतु त्याला ही भूमिका कोणी मिळवून दिली,याची माहिती फारशी कोणाला नाही.ज्या व्यक्तीने अभिलाषकुमारला ही भूमिका लोकप्रिय टीव्ही कलाकार वाहबीज दोराबजीने अभिलाषला भूमिका मिळवून दिली. अभिलाष आणि वाहबीज यांची गेल्या अनेक वर्षांपासून मैत्री आहे. या मालिकेचा काळ पाच वर्षांनी पुढे नेण्यात आल्यावर कथानकात विक्रमची व्यक्तिरेखा सादर करण्यावर विचार सुरू असल्याचे तिला समजले, तेव्हा तिने त्यासाठी अभिलाषचे नाव सुचविले. निर्मात्यांनी त्याला ऑडिशनसाठी बोलावले आणि त्याची लगेचच निवड करण्यात आली. “अभिलाष हा गुणी मुलगा असून तो उत्कृष्ट अभिनेता आहे. विक्रमच्या भूमिकेसाठी अगदी योग्य असून तोच या भूमिकेला न्याय देईल, असं मला वाटलं म्हणून मी त्याचं नाव निर्मात्यांना सुचवलं होतं. त्याची निवड झाली, याचा मला आनंद वाटत असल्याचे वाहबिजने सांगितले आहे. यासंदर्भात अभिलाष म्हणाला, “मला पुन्हा काम करण्याची संधी मिळत असल्याने मी फार उत्सुक आणि आनंदात आहे. कारण मी याच चॅनलवर ‘लौट आओ त्रिशा’ या मालिकेत भूमिका करीत असतानाच माझ्या कारकीर्दीने मोठी झेप घेतली होती. त्यामुळे हे चॅनल माझ्यासाठी लकीचार्म ठरत असून या मालिकेत मी विक्रम या कोट्य़धीश उद्योगपतीची भूमिका साकारतोय. त्याचं त्याच्या बहिणीवर खूप प्रेम असतं. ‘घायल वन्स अगेन’ सिनेमातील भूमिकेसाठी मी ‘त्रिशा’ मालिका सोडली होती. आता जवळपास दोन वर्षांनंतर मी पुन्हा मालिकेत भूमिका करणार असल्याचे अभिलाषने सांगितले. मालिकेत काम करता करता मला सिनेमाच्या ऑफर्स येवू लागल्या त्यामुळे थोडा सिनेमा करण्यात बिझी झालो. आता पुन्हा एकदा चांगली ऑफरही आली आणि विशेष म्हणजे वाहबीजला याचे श्रेय जाते तिच्यामुळेच मी पुन्हा छोट्या पडद्यावर एंट्री करू शकतोय. दोस्त हो तो ऐसा हे वाहीबीजला तंतोतंत सुट होते असेच मी म्हणेन. वाहबीजमुळे पुन्हा एकदा मी माझ्या चाहत्यांशी जोडला जाणार आहे त्यामुळे खूप उत्सुक असल्याचे अभिलाषने म्हटले आहे.

 

Web Title: How was the consignment casting director? Who got the opportunity to work in the series? Read to learn