ड्रोन कॅमेराने केले शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 14:24 IST2016-12-03T14:24:49+5:302016-12-03T14:24:49+5:30

सध्या मालिकेला मनोरंजक आणि आकर्षक करण्यासाठी बºयाच प्रकारचे तंत्र वापरले जातात. ज्याद्वारे चित्रिकरणामध्ये नावीन्यता आणली जाते. चाहूल मालिकेचे प्रोमोज सध्या लोकांच्या पसंतीस आले आहेत तसेच प्रोमोजबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चादेखील होत आहे.

Done camera shooting bananas | ड्रोन कॅमेराने केले शूटिंग

ड्रोन कॅमेराने केले शूटिंग

्या मालिकेला मनोरंजक आणि आकर्षक करण्यासाठी बºयाच प्रकारचे तंत्र वापरले जातात. ज्याद्वारे चित्रिकरणामध्ये नावीन्यता आणली जाते. 'चाहूल' मालिकेचे प्रोमोज सध्या लोकांच्या पसंतीस आले आहेत तसेच प्रोमोजबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चादेखील होत आहे. 

प्रोमोजमधून मालिकेबद्दलची आणि कथानकामध्ये काय असेल याबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे. पहिल्यांदा मराठी मालिकेचे प्रोमो हे ड्रोन कॅमेºयाने शूट करण्यात आले आहेत. 

ड्रोन कॅमेºयाने मोठा कॅनव्हास शूट करणे सोपं जाते. कॅमेरा छोटा असल्यामुळे जास्त तामझामही नसतो, त्यामुळे हा ड्रोन कॅमेरा कुठेही सहजासहजी पोहचू शकतो. वेगळ्या प्रकारचे शॉट्स, तसेच भव्य दृश्य चित्रित करणे या कॅमेºयाने सोपे जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मालिकेच्या प्रोमोशूटमध्ये टॉप शॉट्स असल्याने ते बघायला आकर्षक वाटत आहे. थोडक्यात रसिकांना चांगल्या कथेबरोबर त्यांना नजरेलाही भावतील असे दृष्य मालिकेत चित्रित करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग केला जात आहे. 


Web Title: Done camera shooting bananas