Bigg Boss Marathi: "फक्त सपोर्ट असल्याचं दाखवायचं, खरं तर..."; मीरा-गायत्रीचा नवा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 05:22 PM2021-10-29T17:22:18+5:302021-10-29T17:22:48+5:30

Bigg Boss Marathi: मीरा आणि गायत्री या कायमच घरातील इतर स्पर्धकांविषयी चर्चा करत असतात. आजच्या भागातदेखील असंच काहीसं पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi mira jagannath and gayatri datar new plan | Bigg Boss Marathi: "फक्त सपोर्ट असल्याचं दाखवायचं, खरं तर..."; मीरा-गायत्रीचा नवा प्लॅन

Bigg Boss Marathi: "फक्त सपोर्ट असल्याचं दाखवायचं, खरं तर..."; मीरा-गायत्रीचा नवा प्लॅन

googlenewsNext

 बिग बॉसच्या (bigg boss marathi)  नवनवीन टास्कसोबतच स्पर्धकांमध्ये दररोज नवीन गोष्टींचं गॉसिप रंगत असतं. यामध्ये मीरा आणि गायत्री या कायमच घरातील इतर स्पर्धकांविषयी चर्चा करत असतात. आजच्या भागातदेखील असंच काहीसं पाहायला मिळणार आहे. इतकंच नाही तर त्या दोघींनी आता एक प्लॅन आखल्याचं दिसून येत आहे.

'आपण दोघी आहोत आणि अशाच राहू', असं गायत्री मीराला सांगते. त्याचवेळी 'उत्कर्षचा प्लॅन काय आहे ते माहित नाही. त्यामुळे उद्या त्याच्यासाठी कोण थांबेल हे त्याचं त्यालाच कळू दे', असं मीरा म्हणते. 'उद्या जर त्याच्या एकीकडे स्नेहा आणि एकीकडे उत्कर्ष असेल तर तो कोणासाठी थांबेल?' असं मीरा म्हणते. त्यावर 'तो उत्कर्षसाठी थांबेल', असं गायत्री म्हणते. 
 
मीर म्हणाली, स्पष्ट बोली तृप्ती ताईंना पाठिंबा देणार. तू आणि ती जे काही होईल ते. त्याच्यावर तो आज विचारूच कसं शकतो ? याच्यावरुनच कळतं आहे तो कोणाला सपोर्ट करणार पुढे. मी फक्त दाखवेन माझा सपोर्ट आहे पण मी नाही करणार. ते आपला फायदा घेतात आपण त्यांचा घ्यायचा. त्यांच्यासमोर React नको हाऊस. बेडवर आपणचं असू तेव्हाचं बोलायचं, दुपारी चहा पिताना, प्रत्येक गोष्टीत आपण एकत्र असतो.” 
 

दरम्यान, मीरा आणि गायत्रीने केलेल्या प्लॅननुसार, आता येणाऱ्या टास्कमध्ये त्या काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इतकंच नाही तर हळूहळू त्या उत्कर्षलाही त्यांच्या टीममधून काढून टाकतात की काय हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 
 

Web Title: Bigg Boss Marathi mira jagannath and gayatri datar new plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.