'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वी कोलते पोहोचली घरी, कुटुंबियांनी केलं 'असं' स्वागत; Video व्हायरल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 10:52 IST2026-04-20T10:46:18+5:302026-04-20T10:52:01+5:30

औक्षण केलं अन् जंगी सेलीब्रेशन...; तीन महिन्यांनी तन्वी कोलते पोहोचली घरी,'असं' झालं स्वागत

bigg boss marathi 6 winner tanvi kolte welcomed home by his family and friends celebration video viral | 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वी कोलते पोहोचली घरी, कुटुंबियांनी केलं 'असं' स्वागत; Video व्हायरल  

'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वी कोलते पोहोचली घरी, कुटुंबियांनी केलं 'असं' स्वागत; Video व्हायरल  

Tanvi Kolte Video: जवळपास १०० दिवसानंतर बिग मराठी सहाच्या पर्वानं प्रेक्षकांचा निरोप घेतला. पाच स्पर्धकांमध्ये रंगलेला महाअंतिम सोहळा दणक्यात पार पडला. या अंतिम फेरीत टॉप-५ मध्ये तन्वी कोलतेसह राकेश बापट, दिपाली सय्यद, विशाल कोटियन आणि अनुश्री माने या स्पर्धकांमध्ये चुरस रंगली होती.शेवटपर्यंत अटीतटीचा सामना झाला ज्यामध्ये अभिनेत्री तन्वी कोलते हिने विजेतेपदाचा मान मिळवून या सीझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तन्वी तिच्या घरी पोहोचली आहे.

आपल्या राहत्या घरी पोहोचल्यानंतर तन्वीचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं आणि या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तन्वीच्या आजूबाजूच्या लोकांनी मित्रमंडळींनी आणि कुटुंबियांनी जंगी सेलिब्रेशन केलं. स्वागतावेळी फटाक्यांची आतषबाजी तसेच औक्षण करत घरी जंगी स्वागत करण्यात आलं.'Marathi Manoranjan Vishwa 'नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडीओवर चाहत्यांनीसुद्धा लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंट्सद्वारे ‘अभिनंदन तन्वी... तू खरी विनर आहेस.’, ‘खूप खूप अभिनंदन तन्वी’, अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.


दरम्यान, ‘बिग बॉस ६’च्या घरातला प्रणितचा संपूर्ण प्रवास हा खूपच रंजक होता.तन्वी बिग बॉसच्या घरात केवळ तिच्या खेळासाठी नाही, तर तिच्या रोखठोक स्वभावासाठीही गाजली. घरातील कोणता टास्क असो किंवा इतर गोष्टी असो तन्वीने आपल्या दमदार खेळीने कायम सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. 

तन्वीने हा शो जिंकल्यानंतर तिला बिग बॉस मराठीकडून एक चमचमती ट्रॉफी आणि १५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्याचबरोबर पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांच्याकडून  १० लाखांचा चेक आणि  तुनवाल मोटर्स तर्फे एक शानदार ई-स्कूटर मिळाली आहे. इतकंच नाही, तर रितेश भाऊ आणि राजा शिवाजी चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची एक अतिशय सुरेख फ्रेम गिफ्ट म्हणून दिली आहे.

Web Title : तन्वी कोलते की 'बिग बॉस' जीत के बाद घर वापसी: परिवार ने किया भव्य स्वागत!

Web Summary : 'बिग बॉस मराठी 6' जीतने के बाद तन्वी कोलते का घर पर भव्य स्वागत हुआ। परिवार और दोस्तों ने आतिशबाजी और पारंपरिक रीति-रिवाजों के साथ जश्न मनाया। उन्होंने ट्रॉफी, नकद, उपहार और एक ई-स्कूटर जीता।

Web Title : Tanvi Kolte's victorious 'Bigg Boss' return: Family's grand welcome!

Web Summary : After winning 'Bigg Boss Marathi 6', Tanvi Kolte received a grand welcome home. Family and friends celebrated with fireworks and traditional rituals. She won a trophy, cash, gifts, and an e-scooter for her victory.