"गाडी जुनी, पण स्वप्न नवं आहे...",'बिग बॉस'फेम रोशन भजनकरने घेतली पहिली गाडी, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 10:23 IST2026-05-11T10:20:22+5:302026-05-11T10:23:33+5:30
'बिग बॉस'फेम रोशन भजनकरने स्वकष्टाने घेतली पहिली गाडी, आनंद गगनात मावेना,म्हणाला-"मेहनतीच्या पैशाने घेतलेली वस्तू…"

"गाडी जुनी, पण स्वप्न नवं आहे...",'बिग बॉस'फेम रोशन भजनकरने घेतली पहिली गाडी, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Bigg Boss Marathi 6 Fame Roshan Bhajankar: बिग बॉस मराठी सीझन ६ चं यंदाचं पर्व विविध कारणांमुळे गाजलं.यंदाच्या या पर्वामध्ये विदर्भाचा सुपुत्र बॉडी बिल्डर रोशन भजनकरने सुद्धा एन्ट्री घेतली होती.मात्र,सातव्या आठवड्यात रोशनने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. त्याचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. हमाली करून बॉडी बनवली आणि सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवून थेट बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळवली.एक सिमेंटचं पोतं उचलण्यासाठी त्याला फक्त ३ रुपये ४५ पैसे मिळतात. त्यामुळे ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री घेणं हे त्याच्यासाठी स्वप्नवत होतं. अशातच नुकतीच रोशन भजनकरची स्वप्नपूर्ती झाल्याचं पाहायला मिळाली.
दरम्यान, नुकतीच रोशन भजनकर यांनी घेतली स्वतःच्या कमाईतून चार चाकी
गाडी खरेदी केली आहे. अमरावतीच्या या पठ्याने गाडी घेऊन घरातील प्रत्येक सदस्याचं चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे.आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर खास व्हिडीओ शेअर करत रोशनने गाडी घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत रोशनने लिहिलंय, "ही गाडी जुनी आहे पण स्वप्न मात्र नवं आहे, शेवटी ती मेहनतीच्या पैशाने घेतलेली वस्तू कधीच सेकंड हॅन्ड नसते" म्हणत रोशन भजनकर कुटुंबाने हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
काल मातृदिनाच्या दिवशी रोशनने गाडी घेऊन त्याच्या आईसह कुटुंबियांनी देखील खास सरप्राईज दिलं आहे.या व्हिडीओमध्ये रोशन म्हणतो,"जय महाराष्ट्र मित्रांनो...तुम्हाला एका गोष्ट सांगायची आहे. दोन वर्ष अगोदरची गोष्ट आहे. पाऊसाची वेळ होती, सगळीकडेच पाणी होतं. तेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत टु-व्हिलरवर जात होता. पण, तेव्हा सगळीकडे पाणी भरलं होतं. तेवढ्यात समोरून एक कार चालली होती ते पाहून माझ्या मुलीने मला विचारलं बाबा...आपल्या समोरून कार चाललीये या गाडीत पाणी नाही जात का तर मी म्हणालो नाही. ती गाडी आहे त्यात पाणी जात नाही.तर मग मुलीने विचारलं आपण कधी गाडी घेणार आहोत? पण, तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते पण एक दिवस आपण नक्कीच गाडी घेऊ.... असं मी तिला म्हटलं. मी त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आज स्वत: गाडी घेतली." रोशनचं हे बोलणं ऐकूण अनेकजण भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
दरम्यान,रोशनने गाडी घेतल्याचा व्हिडीओ पाहून बिग बॉसमधील त्याचे सहस्पर्धक सचिन कुमावत तसेच प्राजक्ता शुक्रे यांनी तसेच त्याच्या चाहत्यांनी अभिनंदन केलं आहे.