Bigg Boss Marathi 5: 'या' दोन अभिनेत्यांची चर्चा, मालिका संपताच दिसणार 'बिग बॉस'च्या घरात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 12:59 IST2024-07-17T12:59:08+5:302024-07-17T12:59:52+5:30

या सीझनमध्ये मराठी मालिकांमधील दोन अभिनेते बिग बॉसमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

Bigg Boss Marathi 5 actor Vivek Sangle and Chetan Vadnere may enter the house | Bigg Boss Marathi 5: 'या' दोन अभिनेत्यांची चर्चा, मालिका संपताच दिसणार 'बिग बॉस'च्या घरात?

Bigg Boss Marathi 5: 'या' दोन अभिनेत्यांची चर्चा, मालिका संपताच दिसणार 'बिग बॉस'च्या घरात?

Bigg Boss Marathi 5: मराठी प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तो 'बिग बॉस मराठी' चा पाचवा सिझन लवकरच सुरु होतो. यावेळी महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख होस्ट करताना दिसणार आहे. 'तंटा नाय तर घंटा नाय', 'कल्ला तर होणारच' म्हणत त्याचा प्रोमो रिलीज झाला. या सीझनमध्ये मराठी मालिकांमधील दोन अभिनेते बिग बॉसमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. कोण आहेत ते?

कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी 5 ची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. सीझन कधी सुरु होतो याची उत्सुकता आता ताणली आहे. दरम्यान यावेळी घरात कोण कोण प्रवेश करणार याबाबतही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कलर्स मराठीवरच्याच 'भाग्य तू दिले मला' मालिकेतील अभिनेता विवेक सांगळे (Vivek Sangle) बिग बॉसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. तसंच स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतला अभिनेता चेतन वडनेरे (Chetan Vadnere) सुद्धा बिग बॉसमध्ये येऊ शकतो. अर्थात आता यात किती तथ्य आहे हे 28 जुलैलाच स्पष्ट होईल. 

भाग्य तू दिले मला आणि ठिपक्यांची रांगोळी या दोन्ही मालिकांनी निरोप घेतला आहे. तसंच हे अभिनेते पुन्हा कोणत्या प्रोजेक्टमध्ये अद्याप दिसलेले नाहीत. त्यातच त्यांच्या बिग बॉस एन्ट्रीची चर्चा रंगली आहे. चाहतेही त्यांच्या एन्ट्रीसाठी उत्सुक आहेत. यासोबतच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरच्या नावाचीही काही दिवसांपूर्वी चर्चा होती. येत्या २८ जुलैला 'बिग बॉस मराठी 5'चा प्रीमियर होणार आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 5 actor Vivek Sangle and Chetan Vadnere may enter the house