'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अक्षय म्हात्रे आहे हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 12:48 PM2024-03-21T12:48:21+5:302024-03-21T12:49:12+5:30

'पुन्हा कर्तव्य आहे' ही नवीन मालिका झी मराठी वाहिनीवर सुरु झाली आहे.

Akshay Mhatre starring in marathi serial punha kartavya ahe is husband of shrenu parikh hindi actress | 'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अक्षय म्हात्रे आहे हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा, कोण आहे ती?

'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अक्षय म्हात्रे आहे हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्रीचा नवरा, कोण आहे ती?

झी मराठी वाहिनीवर सध्या नवीन मराठी मालिकांचा तडाखाच सुरु आहे. अनेक नवीन मालिका जुन्या, नव्या स्टारकास्टसह भेटीला येत आहेत. त्यातच एका मालिकेची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे 'पुन्हा कर्तव्य आहे'. महेश मांजरेकरांपासून अनेक मराठी कलाकार या मालिकेचं प्रमोशन करत आहेत. १८ मार्च सुरु झालेल्या या मालिकेत स्टारकास्टही नवीन आहे. 

अक्षय म्हात्रे(Akshay Mhatre) या मालिकेतून मराठी मालिकाविश्वात पदार्पण करत आहेत. अतिशय हटकी अशी ही कथा असणार आहे. अक्षय म्हात्रेने त्याच्या स्मार्ट लूकमधून सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. पण हा अभिनेता नक्की आहे तरी कोण? तर अक्षय हिंदी कलाविश्वात लोकप्रिय आहे. 'ये दिल मांगे मोर','पिया अलबेला' सारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. तसंच अक्षयचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं असून त्याची पत्नी हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिचं नाव आहे श्रेनू पारिख. श्रेनूने 'इस प्यार को क्या नाम दूँ 2', 'इश्कबाज' सारख्या मालिकांमधून स्वत:चा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

अक्षय म्हात्रेही आता मराठी प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची ही नवी मालिका सर्वांनाच आवडेल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. मालिकेतील त्याचा लूक पाहून चाहत्यांनी 'हँडसम', 'स्मार्ट' अशा कमेंटही केल्या आहेत.

श्रेनु आणि अक्षय यांची भेट 2021 मध्ये झाली होती. अक्षय म्हात्रे हा देखील अभिनेता आहे.  'घर एक मंदिर' शोच्या वेळी त्यांची ओळख झाली. त्यानंतर ते अनेकदा एकमेकांना भेटले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अक्षय म्हात्रे मराठी कुटुंबातील असून त्याने मराठी सिरीज, तसंच मराठी म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे. 21 डिसेंबर 2023 रोजी दोघंही लग्नबंधनात अडकले.

Web Title: Akshay Mhatre starring in marathi serial punha kartavya ahe is husband of shrenu parikh hindi actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.