अनिरुद्ध-संजनाला जात्यावर दळता येईना; गडबडीत केलं असं काही की सर्वांनी डोक्यावर मारला हात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 11:05 IST2024-07-18T11:04:59+5:302024-07-18T11:05:22+5:30

'आई कुठे काय करते'चा नवीन प्रोमो पाहिल्यावर तुम्हीही खळखळून हसाल (aai kuthe kay karte)

aai kuthe kay karte serial new promo cooking competition video viral | अनिरुद्ध-संजनाला जात्यावर दळता येईना; गडबडीत केलं असं काही की सर्वांनी डोक्यावर मारला हात!

अनिरुद्ध-संजनाला जात्यावर दळता येईना; गडबडीत केलं असं काही की सर्वांनी डोक्यावर मारला हात!

'आई कुठे काय करते' मालिका सर्वांची आवडती मालिका. या मालिकेत सध्या कूकींग कॉम्पिटिशन सुरु आहे. एकीकडे अनिरुद्ध-संजना तर दुसरीकडे अरुंधती-मिहिर या स्पर्धेचा भाग आहेत. आतापर्यंत एकएक राऊंड पार करत दोन्ही जोड्या पुढे गेल्या आहेत. या कूकींग स्पर्धेच्या पुढच्या राऊंडमध्येल जात्यावर दळण्याचा टास्क आहे. त्यावेळी संजना-अनिरुद्ध काय गडबड करतात हे पाहिल्यावर तुमचीही हसून हसून पुरेवाट होईल.

अनिरुद्ध-संजनाची गडबड अन्..

'आई कुठे काय करते' मालिकेचा नवीन प्रोमो भेटीला आलाय. या प्रोमोत पाहायला मिळेल की कूकींग स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना टास्क दिला जातो. हा टास्क असतो जात्यावर दळण्याचा. सुरुवातीला अरुंधती मिहिरसोबत जात्यावर दळायला बसतात. अरुंधती छान ओवी गात जात्यावर दळते. मिहिरची तिला साथ मिळते. नंतर अनिरुद्ध - संजनाचा नंबर लागतो. दोघेही खाली बसतात. पण कसं दळायचं दोघांनाही माहित नसतं. दोघांची गडबड होते आणि यात जात्यावरचा दांडा तुटतो. त्यामुळे सर्वजण डोक्यावर हात मारतात. 

कोण जिंकणार महाराष्ट्राची सुगरण स्पर्धा?

सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत महाराष्ट्राची सुगरण स्पर्धा हा ट्रॅक सुरु आहे. स्पर्धा जिंकून पैसे कमावून समृद्धी बंगला वाचवता यावा म्हणूनच अरुंधतीने महाराष्ट्राची सुगरण स्पर्धेत भाग घेतला आहे. अरुंधतीची स्वयंपाकाची आवड सर्वांनाच माहित आहे. अरुंधतीला साथ देणारा मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. मात्र अरुंधती जिंकू नये यासाठी अनिरुद्ध आणि संजना देखिल या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे आता कोण जिंकणार हे पाहायचं आहे. 

Web Title: aai kuthe kay karte serial new promo cooking competition video viral