रश्मिका मंदानाचा अपघात, पोस्ट करत श्रीवल्लीने दिली माहिती, म्हणाली- "गेल्या महिन्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 09:13 IST2024-09-10T09:13:01+5:302024-09-10T09:13:33+5:30

रश्मिकाच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. रश्मिकाचा अपघात झाल्याची माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. 

rashmika mandanna minor accident actress shared health update with fans post | रश्मिका मंदानाचा अपघात, पोस्ट करत श्रीवल्लीने दिली माहिती, म्हणाली- "गेल्या महिन्यात..."

रश्मिका मंदानाचा अपघात, पोस्ट करत श्रीवल्लीने दिली माहिती, म्हणाली- "गेल्या महिन्यात..."

रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांत काम केलेल्या रश्मिकाला पुष्पा सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली. रश्मिका सध्या पुष्पा २ मुळे चर्चेत आहे. रश्मिकाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. पण, रश्मिकाच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. रश्मिकाचा अपघात झाल्याची माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. 

रश्मिकाचा गेल्या महिन्यात अपघात झाला होता. याबाबत अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून रश्मिकाने तिचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत. रश्मिकाने एक फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने अपघाताबाबत पोस्ट लिहिली आहे.

रश्मिकाची अपघाताबाबत पोस्ट 

हॅलो, तुम्ही कसे आहात? 

गेल्या काही दिवसांपासून मी सोशल मीडियावर किंवा सार्वजनिकरित्याही सक्रिय नाही. गेल्या महिन्यात मी फारशी सोशल मीडियावर सक्रिय नव्हते याचे कारण म्हणजे माझा छोटासा अपघात झाला होता. यातून लवकर बरे होण्यासाठी डॉक्टरांनी मला घरी राहण्याचा सल्ला दिला होता. 

आता मी बरी आहे. आता मी सुपर अॅक्टिव्ह होण्याच्या फेजमध्ये आहे, यासाठी मला शुभेच्छा द्या. स्वत:ची काळजी घेणं ही नेहमीच प्रायोरिटी असली पाहिजे. कारण, आयुष्य फार छोटं आहे. उद्या आपल्याला आनंदाची निवड करायला मिळेल की नाही हे सांगू शकत नाही. 


रश्मिकाच्या या पोस्टमुळे चाहते चिंतेत आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी रश्मिकाला काळजी घेण्यास सांगितलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रश्मिका गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिसली होती. धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमाला रश्मिकाने परळी येथे हजेरी लावली होती. 

Web Title: rashmika mandanna minor accident actress shared health update with fans post