मृणाल ठाकूरचा 'डकैत' चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार; 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:21 IST2026-04-30T15:21:14+5:302026-04-30T15:21:44+5:30

मृणाल ठाकूर आणि आदिवी शेष यांचा बहुचर्चित 'डकैत' चित्रपट कोणत्या ओटीटीवर पाहता येईल? वाचा सविस्तर

Mrunal Thakur Adivi Sesh Dakait Movie Ott Release Date Prime Video | मृणाल ठाकूरचा 'डकैत' चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार; 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

मृणाल ठाकूरचा 'डकैत' चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार; 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

Mrunal Thakur Dakait Ott Release : मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या नव्या 'डकैत' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मृणाल आणि दाक्षिणात्य अभिनेता आदिवी शेष यांची मुख्य भूमिका असलेला 'डकैत' हा चित्रपट आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. तर तो कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, हे जाणून घेऊया.

१० एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला 'डकैत' आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर येत आहे. 'डेक्कन क्रोनिकल'च्या वृत्तानुसार, हा चित्रपट ८ मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ तेलुगूच नाही, तर तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येईल. जरी निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली, तरी या बातमीमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

'या' प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?

'डकैत' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार, याबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, या चित्रपटाचे डिजिटल हक्क ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) कडे असल्याचे म्हटले जात आहे. आता निर्माते याबद्दल अधिकृत घोषणा कधी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'डकैत' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संमिश्र यश मिळवले आहे. गेल्या २० दिवसांत या चित्रपटाने भारतात सुमारे ४२.२३ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर जगभरात या चित्रपटाचा गल्ला ५४ कोटी रुपयांवर पोहोचला. मृणाल आणि आदिवी शेष यांच्यासोबतच या चित्रपटात प्रकाश राज आणि अनुराग कश्यप यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मृणाल ठाकूरचा थक्क करणारा प्रवास

टेलिव्हिजनपासून अभिनय प्रवासाची सुरुवात करून, अल्पावधीतच बॉलिवूडसह साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख धुळेच्या या लेकीने निर्माण केली आहे. मृणालने 'कुमकुम भाग्य'मधील 'बुलबुल' या भूमिकेतून घराघरांत ओळख मिळवली. तसेच तिने 'विट्टी दांडू' आणि 'सुराज्य' या मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. 'सीता रामम' या चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. 'सुपर ३०', 'जर्सी', 'हाय पापा' आणि 'लस्ट स्टोरीज २'मधील तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. आता ओटीटीवर 'डकैत'ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title : मृणाल ठाकुर की 'डकैत' फिल्म: अब घर बैठे देखें!

Web Summary : मृणाल ठाकुर की 'डकैत', जिसमें आदिवी शेष भी हैं, जल्द ही ओटीटी पर रिलीज़ होगी। अमेज़ॅन प्राइम वीडियो पर 8 मई के आसपास उपलब्ध होने की उम्मीद है, यह कई भाषाओं में उपलब्ध होगी। फिल्म ने भारत में ₹42.23 करोड़ की कमाई की है।

Web Title : Mrunal Thakur's 'Dakait' Movie: Watch it at Home Soon!

Web Summary : Mrunal Thakur's 'Dakait,' co-starring Adivi Sesh, is set for an OTT release. Expected on Amazon Prime Video around May 8th, it will be available in multiple languages. The film has grossed ₹42.23 crore in India.