"मी हे शहर आणि संगीत कायमचं सोडतेय!"; गायिकेच्या पोस्टने उडाली खळबळ; लोकप्रिय अभिनेत्यासोबत अफेअरच्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 10:02 IST2026-05-16T10:02:13+5:302026-05-16T10:02:41+5:30
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायिकेने लोकांच्या आरोपांना कंटाळून शहरच सोडलं असल्याची गोष्ट समोर आली आहे

"मी हे शहर आणि संगीत कायमचं सोडतेय!"; गायिकेच्या पोस्टने उडाली खळबळ; लोकप्रिय अभिनेत्यासोबत अफेअरच्या चर्चा
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रवी मोहन (जयम रवी) आणि त्याची पत्नी आरती यांच्यातील घटस्फोटानंतर गायिक केनीशा फ्रान्सिस सतत चर्चेत राहिली आहे. रवी मोहनसोबतच्या वाढत्या जवळीकीमुळे केनीशावर सोशल मीडियावरून जोरदार टीका झाली आणि अनेकांनी तिला 'होम ब्रेकर' (घर तोडणारी) देखील म्हटले. या सर्व ट्रोलिंगला कंटाळून केनीशाने आता एक भावुक पोस्ट शेअर करत इन्स्टाग्राम आणि चेन्नई शहर सोडण्याची घोषणा केली आहे.
इन्स्टाग्राम आणि चेन्नई सोडण्याचा निर्णय
केनीशाने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहून म्हटले आहे, "मी या गोष्टीत प्रेमाने आले होते, पण आता शांततेने बाहेर पडत आहे. काही ठिकाणी इतका गोंधळ, अहंकार आणि खोट्या कहाण्या असतात की तिथे चांगुलपणाला श्वास घ्यायलाही जागा उरत नाही. ज्या व्यक्तीसाठी जगाने आधीच एक नकारात्मक कथा ठरवून ठेवली होती, त्याचा बचाव करण्याच्या प्रयत्नात मी स्वतःचं अस्तित्व गमावलं आहे."
ट्रोलिंगवर व्यक्त केला संताप
तिने पुढे लिहिले, "या जगाला केवळ खोटेपणा, फसवणूक आवडते. ऑनलाइन ट्रोलिंगमुळे मी माझे संगीत, थेरपी आणि माझ्या आयुष्याशी संबंधित सर्व गोष्टी सोडत आहे. मी चेन्नई सोडले असून आता हार मानली आहे. मी इन्स्टाग्राम आणि इतर सर्व सोशल मीडिया प्रोफाइलवरून लॉग आऊट करत आहे. आज 'स्त्रीवाद' (फेमिनिझम) जिंकला पण 'आनंद' हरला. तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं." तसेच तिने आपल्या मित्र आणि कुटुंबीयांना या कठीण काळात तिचं खासगी आयुष्य जपण्याची विनंती केली आहे.
ब्रेकअपचे संकेत?
केनीशाच्या या पोस्टमुळे सोशल मीडिया युझर्स असा अंदाज लावत आहेत की तिचं आणि अभिनेता रवी मोहनचं ब्रेकअप झालं आहे. जरी रवी मोहनसोबतचे तिचे फोटो अजूनही इन्स्टाग्रामवर असले, तरी तिने पोस्टचे कमेंट सेक्शन बंद केले आहे. यापूर्वी केनीशाने दोन व्हिडिओ शेअर करून सांगितलं होतं की, ती रवी मोहनसोबत कोणत्याही रोमँटिक नात्यात नाही आणि तिने त्याच्या वैवाहिक आयुष्यात कधीही हस्तक्षेप केला नाही; ती फक्त त्याला प्रोफेशनल मदत करत होती. मात्र, नंतर तिने ते व्हिडिओ डिलीट केले होते.