स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:26 IST2025-05-30T17:24:21+5:302025-05-30T17:26:35+5:30

'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका होती. ही मालिका २००० मध्ये सुरू झाली. या शोमध्ये स्मृती इराणी यांची मुख्य भूमिका होती.

Smriti Irani to shoot kyuki saas bhi kabhi bahu thi-2 z plus security Will people's phones be tapped | स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?

स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?

'क्योंकि सास भी कभी बहू थी'च्या सीझन २ ची घोषणा झाली आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच शोचे कास्टसंदर्भात चाहते अत्यंत उत्सूक आहेत. ओजी तुलसी स्मृती ईराणी आणि अॅक्टर अमर उपाध्याय शोमध्ये पुन्हा येणार, अशी चर्चा होती. मात्र आता, स्मृती ईराणी झेड प्लस सिक्यूरिटीमध्ये शोचे शूटिंग करणार, असे वृत्त आहे. महत्वाचे म्हणजे, सेट वरील प्रत्येकाचे फोन टॅप केले जातील, असेही वृत्त आहे.

झेड प्लस सिक्योरिटीमध्ये शूटिंग करणार स्मृती ईराणी -
इंडिया फोरम्सच्या रिपोर्टनुसार, स्मृती इराणी झेड प्लस सुरक्षेत मालिकेचे शूटिंग करतील. शोच्या सेटवर लोकांना येण्या-जाण्यास बंदी असेल. याच वेळी, सेटवर जवळजवळ प्रत्येकाचे फोन टॅप केले जातील. मालिकेशी संबंधित सूत्रांनी इंडिया फोरम्सला दिलेल्या माहितीनुसार, "अमर सर, स्मृती मॅम आणि एकता मॅम वगळता सर्वांचे फोन टॅप केले जातील. सेटवर कोणालाही फोन वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. स्मृती इराणी झेड प्लस सुरक्षेत मालिकेचे शूटिंग करतील. सर्वांना सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल."

वर्ष 2000 मध्ये सुरू झाली होती मालिका -
'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका होती. ही मालिका २००० मध्ये सुरू झाली. या शोमध्ये स्मृती इराणी यांची मुख्य भूमिका होती.  स्मृती व्यतिरिक्त रोनित रॉय, हितेन तेजवानी आणि सुधा शिवपुरी सारखे कलाकार या शोमध्ये होते. हा शो २००० ते २००८ पर्यंत टीव्हीवर प्रसारित झाला. IMDb नुसार, या शोने एकूण ४७ पुरस्कार जिंकले होते. हा शो एकता कपूर यांनी तयार केला होता. 

Web Title: Smriti Irani to shoot kyuki saas bhi kabhi bahu thi-2 z plus security Will people's phones be tapped