"आम्हाला दोघांना एकत्र पाहायला आवडेल का?", अशोक सराफ यांच्यासोबत फोटो पोस्ट करत संकर्षणची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 18:07 IST2026-04-22T18:06:57+5:302026-04-22T18:07:23+5:30
संकर्षणने दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे.

"आम्हाला दोघांना एकत्र पाहायला आवडेल का?", अशोक सराफ यांच्यासोबत फोटो पोस्ट करत संकर्षणची पोस्ट
संकर्षण कऱ्हाडे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. अनेक मालिका, नाटक आणि काही सिनेमांमध्येही तो झळकला आहे. अभिनेता असण्यासोबतच तो उत्तम कवीदेखील आहे. संकर्षण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. चाहत्यांना तो पोस्टच्या माधम्यातून करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो. नुकतंच त्याने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
संकर्षणने दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे. "द ग्रेट अशोक सरांसोबत मी काम केलं तर; आम्हाला दोघांना एकत्र पहायला आवडेल का हो तुम्हाला…??? आधी तुम्ही खरं सांगा… मग मी तुम्हाला सगळं खरं खरं काय ते सांगतो", असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी संकर्षण आणि अशोक सराफ यांना एकत्र काम करताना बघायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
संकर्षण नव्या प्रोजेक्टमध्ये अशोक सराफ यांच्यासोबत काम करणार असल्याचा अंदाज त्याच्या पोस्टवरुन चाहत्यांनी लावला आहे. याबाबत संकर्षणने नेमकं काय ते सांगितलेलं नाही. मात्र त्याच्या या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांनाही उत्सुकता आहे. सध्या संकर्षण झी मराठीवरील 'आम्ही सारे खवय्ये' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.