नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर समांथाचं सेलिब्रेशन, पोस्ट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:39 IST2024-08-09T12:38:39+5:302024-08-09T12:39:17+5:30

चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समांथाने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

Samantha Ruth Prabhu Shares FIRST Post After Ex Naga Chaitanya’s Engagement with Sobhita Dhulipala | नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर समांथाचं सेलिब्रेशन, पोस्ट करत म्हणाली...

नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर समांथाचं सेलिब्रेशन, पोस्ट करत म्हणाली...

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूपासून  (Samantha Ruth Prabhu)  विभक्त झाल्यानंतर तीन वर्षांनी नागा चैतन्य (Naga Chaitanya) दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. त्याने 8 ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत (Sobhita Dhulipala) साखरपुडा केला. चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समांथाने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू यांनी एकमेकांना 7  वर्षे डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्न केलं होतं. गोव्यात या जोडप्याचा ख्रिश्चन आणि दक्षिण भारतीयपद्धतीने विवाहसोहळा पार पडला होता. मात्र, चार वर्षांतच हे नाते संपुष्टात आले. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधी या दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली होती. मात्र, दोघांनीही घटस्फोटाचे कारण सांगितले नव्हते.


समांथापासून वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्यचे नाव शोभिताशी जोडले जाऊ लागले. दोघांच्या अफेअरची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. आता अखेर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर दुसरीकडे समांथाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हॉकी संघाने कांस्यपदक जिंकल्याचा आनंद साजरा केला. तिने आपल्या सोशल मीडियावर  भारतीय हॉकी संघाचा फोटो शेअर केला आहे.

समांथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर ती लवकरच  राज आणि डीके दिग्दर्शित Citadel: Honey Bunny या थ्रिलर सिरीजमध्ये दिसणार आहे. या सिरीजमध्ये ती वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळेल.  ही सिरीज 7 नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे.

Web Title: Samantha Ruth Prabhu Shares FIRST Post After Ex Naga Chaitanya’s Engagement with Sobhita Dhulipala