उद्या दुपारी १२:१२ वाजता काय होणार? आदित्य धर यांच्या पोस्टने उडाली खळबळ; 'धुरंधर २' ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 20:56 IST2026-02-02T20:54:34+5:302026-02-02T20:56:18+5:30

Ranveer Singh Dhurandhar 2 Teaser Tomorrow : उद्या १२:१२ वाजता 'धुरंधर २' चा टीझर रिलीज होणार आहे. रणवीर सिंहचा 'बीस्ट मोड' आणि अर्जुन रामपालची विलेन म्हणून एन्ट्री. वाचा सविस्तर माहिती.

Ranveer Singh Dhurandhar 2 Teaser Tomorrow : What will happen tomorrow at 12:12 pm? Aditya Dhar's post created a stir; 'Dhurandhar 2' ... | उद्या दुपारी १२:१२ वाजता काय होणार? आदित्य धर यांच्या पोस्टने उडाली खळबळ; 'धुरंधर २' ...

उद्या दुपारी १२:१२ वाजता काय होणार? आदित्य धर यांच्या पोस्टने उडाली खळबळ; 'धुरंधर २' ...

थिएटरमध्ये धुमाकुळ घातल्यानंतर आता धुरंधर सिनेमाने ओटीटीवर देखील कल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अशातच धुरंधर २ च्या टिझरची चर्चा सुरु असताना दिग्दर्शक आदित्य धर यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केवळ “TOMORROW 12:12” असे लिहित संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडविली आहे. उद्या ‘धुरंधर २’ (Dhurandhar 2) चा टीझर रिलीज होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

पहिल्या पार्टमध्ये जबरदस्त यश मिळवल्यानंतर रणवीर सिंह आता दुसऱ्या भागात अधिक शक्तीशाली रुपात दिसण्याची शक्यता आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, ज्यांनी या टीझरची झलक पाहिली आहे, त्यांचे म्हणणे आहे की रणवीर सिंह पूर्णपणे ‘बीस्ट मोड’ मध्ये आहे. त्याचा रॉ आणि खतरनाक लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा आहे. या चित्रपटात रणवीरच्या पात्राची 'बॅकस्टोरी' दाखवली जाणार असून, त्याच्यासोबत काय झालेले, तो का तुरुंगात होता याची माहिती दाखविली जाण्याची शक्यता आहे. 

अक्षय खन्नाची एक्झिट, अर्जुन रामपालची एन्ट्री!
'धुरंधर'च्या पहिल्या भागात अक्षय खन्नाने 'रहमान' या खलनायकाची भूमिका साकारली होती, ज्याचा शेवट पहिल्या भागात झाला. आता 'धुरंधर २' मध्ये रणवीर सिंहच्या समोर एक नवीन आणि तितकाच ताकदवान शत्रू असणार आहे. कयास लावले जात आहेत की, अर्जुन रामपाल या आगामी ॲक्शन थ्रिलरमध्ये मुख्य खलनायकाच्या (विलेन) भूमिकेत दिसेल. अर्जुनचा लूक आणि त्याचा स्क्रीन प्रेझन्स पहिल्या भागापेक्षा अधिक घातक असणार असल्याची चर्चा आहे.

Web Title : आदित्य धर के पोस्ट से मची खलबली: कल दोपहर 12:12 बजे क्या होगा?

Web Summary : आदित्य धर के रहस्यमय पोस्ट ने 'धुरंधर 2' के टीज़र रिलीज की चर्चा शुरू की। रणवीर सिंह की वापसी, संभावित रूप से अर्जुन रामपाल का सामना, अक्षय खन्ना की जगह खलनायक। 'बीस्ट मोड' प्रदर्शन और पिछली कहानी के खुलासे की उम्मीद।

Web Title : Aditya Dhar's Post Creates Stir: What's Happening Tomorrow at 12:12?

Web Summary : Director Aditya Dhar's cryptic post sparks 'Dhurandhar 2' teaser release buzz. Ranveer Singh returns, potentially facing Arjun Rampal, replacing Akshay Khanna as villain. Expect a 'beast mode' performance and backstory revelations.