दीपिकानंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं दिली गोड बातमी, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:48 IST2026-04-22T12:46:58+5:302026-04-22T12:48:15+5:30
लोकप्रिय जोडीनेही आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. Puja Banerjee Kunal Verma Announces Second Pregnancy Viral Video

दीपिकानंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं दिली गोड बातमी, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…
बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अलीकडेच आपण दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. या बातमीने चाहते आनंदात असतानाच आता छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय जोडीनेही आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बॅनर्जी (Puja Banerjee) आणि अभिनेता कुणाल वर्मा (Kunal Verma) हे लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत.
पूजा बॅनर्जीनं ही आनंदाची बातमी चाहत्यांना युट्यूब व्लॉगद्वारे दिली. ज्यात तिनं प्रेग्नेंसी टेस्टचा पॉझिटिव्ह निकाल कळल्याचा क्षण दाखवला आहे. इतकेच नाही, तर व्हिडीओमध्ये तिने आपले 'बेबी बम्प' दाखवत आई होताना शरीरात होणाऱ्या बदलांचा हा प्रवास किती सुखद आहे, हे चाहत्यांना सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी कमेंट्समध्ये त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. पूजा आणि कुणाल यांना आधीच एक मुलगा आहे. आता हे दांपत्य दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
पूजा आणि कुणाल यांची ओळख 'तुझ संग प्रित लगाई सजना' या मालिकेच्या सेटवर झाली होती. एकत्र काम करताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी एप्रिल २०२० मध्ये नोंदणीकृत पद्धतीने लग्न केले. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा पारंपरिक बंगाली पद्धतीने थाटामाटात लग्नगाठ बांधली.