Vaishali Thakkar Suicide: "दीड वर्ष तो मला..." वैशाली ठक्करच्या डायरीतून झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 12:20 PM2022-10-17T12:20:57+5:302022-10-17T12:51:22+5:30

अभिनेत्रीने तिच्या सुसाईड नोटमध्ये तिच्या आई-वडिलांची माफी मागत टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारणही सांगितलं आहे

टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar Suicide) आत्महत्या प्रकरणात मोठा अपडेट समोर आला आहे. अभिनेत्रीच्या कथित डायरीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अभिनेत्रीने डायरीत लिहिलेले शेवटचे शब्द वाचून सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा राहिला. असा दावा केला जात आहे की, अभिनेत्रीने तिच्या सुसाईड नोटमध्ये तिच्या आई-वडिलांची माफी आहे. एवढंच नाही तर मोठं पाऊल उचलण्यामागचं कारणही सांगितलं आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

जगाचा निरोप घेण्यापूर्वी वैशाली ठक्करने तिच्या कथित सुसाईड नोटमध्ये 'I Quit.' असे लिहिले आहे. हे शब्द वैशाली ठक्करचे शेवटचे शब्द होते. याशिवाय त्याने आपल्या शेजारी आणि त्याच्या पत्नीचाही या चिठ्ठीत उल्लेख केला आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

अभिनेत्रीने तिच्या कथित डायरीमध्ये लिहिले आहे की, 'एक मुलगी नसेल तेव्हा तिच्याशी संबंधित कोणतीही समस्या देखील राहणार नाही. I Quit माँ, आय लव्ह यू पापा. मी चांगली मुलगी होऊ शकले नाही मला माफ करा.' (फोटो इन्स्टाग्राम)

याशिवाय अभिनेत्रीने राहुल आणि त्याची पत्नी दिशाचे नाव घेत, दोघांनीही तिचा जवळपास अडीच वर्षे मानसिक छळ केला. इतकेच नाही तर या सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीने दोघांनाही शिक्षा देण्याची विनंती केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

वैशाली ठक्करने लिहिले आहे की, 'प्लीज राहुल आणि दिशाला शिक्षा द्या नाहीतर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करते, मला माफ करा. (फोटो इन्स्टाग्राम)

वैशालीने इंदूरमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन जगताला धक्का बसला आहे. वैशालीच्या जाण्याने तिच्या जवळच्या मैत्रिणींना धक्का बसला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

तपासादरम्यान पोलिसांना वैशालीची पर्सनल डायरी तिच्या घरातून सापडली. आता त्याच डायरीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

वैशाली ठक्करने स्टार प्लसवरील शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)

या शोमध्ये वैशालीने संजनाची भूमिका साकारली होती. यानंतर वैशाली 'ये वादा रहा', 'ये है आशिकी', 'ससुराल सिमर का', 'सुपर सिस्टर', 'लाल इश्क' आणि 'विष-अमृत' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले.(फोटो इन्स्टाग्राम)