IN PICS : 'पाहिले न मी तुला' मालिकेत शशांक केतकरसोबत झळकणारी ही नवी अभिनेत्री आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 09:56 AM2021-02-19T09:56:40+5:302021-02-19T10:11:31+5:30

'पाहिले न मी तुला' ही नवी मालिका 1 मार्चपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला. (Photo Instagram)

या मालिकेत शशांक केतकर सोबत एक नवा चेहरा प्रोमोमध्ये दिसतोय. ही अभिनेत्री आहे तन्वी प्रकाश मुंडळे. (Photo Instagram)

तन्वीने याआधी ‘अ रिस्पेक्टेबल वेडिंग’, ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ अशा नाटकांतून तीने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)

लवकरच ती सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरसोबत “COLORफूल” या सिनेमात देखील झळकणार आहे.(Photo Instagram)

“COLORफूल” हा सिनेमा 2 जुलै 2021ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा तन्वीचा पहिलाच सिनेमा आहे. (Photo Instagram)

तन्वीला अभिनयासह नृत्याचीदेखील आवड आहे. (Photo Instagram)

पुण्यात लहानाची मोठी झालेली तन्वी फिजिक्स मधून बीएस्सी केलं आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तन्वी खूपच सक्रिय असते. (Photo Instagram)

आपले नवे फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo Instagram)

चाहते ही तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Photo Instagram)