४२ वर्षांच्या श्वेता तिवारीचं पिवळ्या साडीत खुललं सौंदर्य, चाहते म्हणाले, 'लेकीपेक्षा आईच...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:51 PM2023-07-31T12:51:47+5:302023-07-31T13:16:21+5:30

श्वेता तिवारीचे फोटोशूट कायम चर्चेत असतात.

काही लोकांकडे पाहून वयाचा अंदाजच लागत नाही. आपल्या फिटनेसने ते अनेकांना घायाळ करतात. याचंच ज्वलंत उदाहरण म्हणजे टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari). वयाच्या ४२ व्या वर्षीही तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

श्वेताला 22 वर्षांची पलक ही मुलगी आहे तर 7 वर्षांचा रेयांश हा मुलगा आहे. श्वेताने सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत मुलीलाही मागे टाकले आहे. श्वेताचा दुसऱ्यांदा घटस्फोट झाला असून ती एकटीच मुलांचा सांभाळ करते.

श्वेताला खरंतर कोणत्याही परिचयाची गरज नाही. खूप कमी वयात तिने यश संपादन केलंय. चाहत्यांमध्ये तर ती अभिनय आणि लुक्समुळे कायम चर्चेत असते. टोन्ड बॉडी आणि हॉटनेसमुळे तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. नुकतंच तिने पिवळ्या साडीत केलेले फोटोशूट व्हायरल होत आहे.

श्वेता नेहमीच ग्लॅमरस फोटोशूट करत असते. तिची झलक पाहताच चाहते तिची तारीफ करण्यावाचून राहत नाहीत. हिरवा ब्लाऊज आणि पिवळी साडी असा श्वेताचा लुक आहे. यामध्ये तिच्या अदा चाहत्यांना प्रेमात पाडणाऱ्या आहेत. सोबत सिल्व्हर रंगाचे झुमके, काळ्या रंगाची टिकली तिचं सौंदर्य आणखी खुलवत आहेत.

श्वेताने अगदीच न्यूड मेकअप केलाय. गुलाबी रंगाची हलकी लिपस्टिक लावली आहे. तर झुमक्याशिवाय तिने बोटात सिल्व्हर अंगठी घातली आहे. श्वेता या लुकमध्ये स्वीमिंग पूलमध्ये उतरलेली दिसते. तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

श्वेताची लेक पलक तिवारीने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. तसंच ती सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

'हिच्यासमोर सगळेच फेल आहेत','मुलीपेक्षा आईच सुंदर दिसते','सौंदर्याबाबतीत श्वेताला कोणीच टक्कर देऊ शकत नाही' अशा अनेक कमेंट्स तिच्या फोटोशूटवर आल्या आहेत