४ अभिनेत्यांनी गाठला गुढीपाडव्याचा मुहुर्त! दणक्यात केला साखरपुडा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 01:36 PM2024-04-10T13:36:07+5:302024-04-10T13:56:52+5:30

गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत एक दोन नव्हे तर तब्बल ४ मराठी कलाकारांनी साखरपुडा केला आहे.

मराठी कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून सनई चौघडे वाजत आहेत. अनेक सेलिब्रेटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

तर काही सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत एक दोन नव्हे तर तब्बल ४ मराठी कलाकारांनी साखरपुडा केला आहे.

यामध्ये 'रंग माझा वेगळा' मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेले दोन अभिनेते आहेत. दोघांनीही एकाच दिवशी प्रेमाची कबुली दिली आहे.

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेता अंबर गणपुळेने 'राजा राणीची गं जोडी' फेम अभिनेत्री शिवानी सोनारबरोबर साखरपुडा केला आहे.

तर 'रंग माझा वेगळा' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल राजेशिर्केनेही गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर साखरपुडा केला आहे.

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत श्रीनूची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक गावकरनेही साखरपुडा करत प्रेमाची कबुली दिली आहे.

अभिषेकने सोशल मीडिया स्टार सोनालीबरोबर मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे.

'कन्यादान' फेम अभिनेता चेतन गुरव याचाही गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर साखरपुडा पार पडला आहे.